ज्वलनशील पदार्थ नेणे पडले महागात; तीन हजार २८४ प्रवाशांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 11:37 AM2023-11-18T11:37:22+5:302023-11-18T11:37:51+5:30

मुंबई : भारतीय रेल्वेने धावत्या रेल्वे गाड्या आगीच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षा तपासणी मोहीम हाती घेतली होती. १४ दिवासांच्या मोहिमेंतर्गत ...

Transporting flammable materials became expensive; Action against three thousand 284 passengers | ज्वलनशील पदार्थ नेणे पडले महागात; तीन हजार २८४ प्रवाशांवर कारवाई

ज्वलनशील पदार्थ नेणे पडले महागात; तीन हजार २८४ प्रवाशांवर कारवाई

मुंबई : भारतीय रेल्वेने धावत्या रेल्वे गाड्या आगीच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षा तपासणी मोहीम हाती घेतली होती. १४ दिवासांच्या मोहिमेंतर्गत ३७ हजार ३११ ट्रेन आणि २२ हजार ११० स्थानकांची तपासणी केली असून, ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणाऱ्या तीन हजार २८४ प्रवाशांवर कारवाई केली आहे.

धावत्या रेल्वे गाड्यात आणि रेल्वे स्थानकात आगीच्या घटना कमी करण्यासाठी रेल्वेचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे. दिवाळीत उत्सव काळात मोठ्या प्रमाणात प्रवासी फटाके घेऊन प्रवास करत असल्याचे बाब रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आली. फटाके वाहून नेल्याने प्रवाशांच्या जीविताला धोका असल्याने भारतीय रेल्वेने १ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत सुरक्षा तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत पार्सल व्हॅन, प्रवाशांच्या सामानाची तपासणी करणे आणि ज्वलनशील वस्तूंसाठी गाड्यांमधील सर्व डस्टबिन तपासणे यांचा समावेश आहे. 

Web Title: Transporting flammable materials became expensive; Action against three thousand 284 passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.