कुर्ला स्थानकातील वृद्ध महिलांना लुटणारा जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 05:29 AM2018-09-29T05:29:07+5:302018-09-29T05:29:13+5:30

माझे लग्न झाले आहे. त्या आनंदात आई वृद्ध महिलांना साडी वाटतेय,’ असे सांगून कुर्ला स्थानकात उतरणाऱ्या ज्येष्ठ महिलांना एका इमारतीत नेत लुटले जात असल्याच्या घटनेने खळबळ उडाली.

The traps of old women in Kurla station | कुर्ला स्थानकातील वृद्ध महिलांना लुटणारा जाळ्यात

कुर्ला स्थानकातील वृद्ध महिलांना लुटणारा जाळ्यात

Next

मुंबई : ‘माझे लग्न झाले आहे. त्या आनंदात आई वृद्ध महिलांना साडी वाटतेय,’ असे सांगून कुर्ला स्थानकात उतरणाऱ्या ज्येष्ठ महिलांना एका इमारतीत नेत लुटले जात असल्याच्या घटनेने खळबळ उडाली. अखेर कुर्ला पोलिसांनी प्रवासी बनून कुर्ला स्थानकात सुरू केलेली शोधमोहीम मुंब्य्रापर्यंत पोहोचली. ज्येष्ठ महिलांना लुटणाºया मोहम्मद अमीर इरफान (२०) ला बेड्या ठोकल्या आहेत.
मुंब्रा येथील रहिवासी असलेला इरफान हा आठवी पास आहे. गुन्हे मालिका, चित्रपटांमध्ये लुटीच्या घटना बघून, त्यानेही तसेच पैसा मिळविण्याचे ठरविले. सावजाच्या शोधात त्याने कुर्ला स्थानक गाठले. स्थानकातून एकट्या बाहेर पडणाºया महिलांचा तो पाठलाग करत असे. पुढे त्या महिला एखाद्या इमारतीजवळ पोहोचताच तो त्यांना थांबवायचा. लग्न, मुलगा झाल्याच्या आनंदात आई वृद्ध गरीब महिलांना साड्या वाटत असल्याचे सांगायचा. सावज जाळ्यात येताच, त्यांना समोरच्या इमारतीकडे जायचे असल्याचे सांगून सोबत जायचे, इमारतीजवळ येताच गरीब वाटावे म्हणून दागिने पिशवीत काढून ठेवा, असा सल्ला तो महिलांना देत होता. त्याच्यावर विश्वास ठेवत, महिला अंगावरील दागिने काढून पर्समध्ये ठेवत. ती पिशवी इरफानकडे देऊन त्या इमारतीत जाताच इरफान दागिने घेऊन पसार व्हायचा.
गेल्या काही दिवसांत अशा स्वरूपाच्या घटनांनी डोके वर काढले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पीएसआय सत्यवान पवार यांनी अंमलदार पठाण, भाबड, जोशी, पाटील आणि काळे यांच्यासह आरोपीचा शोध सुरू केला.

पैशातून मजामस्ती

घरातल्या व्यक्ती आजारी असल्याचे सांगून, त्याने ते दागिने सराफाकडे गहाण ठेवले.
या पैशांतून त्याने देशातील विविध भागांत दौरे सुरू केले होते, तसेच मित्र-मैत्रिणींना महागड्या हॉटेलात पार्ट्याही दिल्याचे तपासात समोर आले.

Web Title: The traps of old women in Kurla station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.