Join us  

कचरा स्पेशल ट्रेनला ब्रेक लागणार

By admin | Published: April 16, 2016 1:37 AM

मध्य रेल्वे रुळांवर आणि ट्रॅकच्या बाजूला असलेल्या छोट्या नाल्यांमधील कचरा उचलण्यासाठी असलेल्या कचरा स्पेशल ट्रेनला ब्रेक लागला आहे. मध्य रेल्वेकडे असलेल्या

मुंबई : मध्य रेल्वे रुळांवर आणि ट्रॅकच्या बाजूला असलेल्या छोट्या नाल्यांमधील कचरा उचलण्यासाठी असलेल्या कचरा स्पेशल ट्रेनला ब्रेक लागला आहे. मध्य रेल्वेकडे असलेल्या दोन कचरा स्पेशल लोकल या डीसी परिवर्तनावर धावणाऱ्या होत्या. आता पूर्णपणे एसी परिवर्तन मध्य रेल्वेवर झाल्याने या लोकल धावू शकत नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी दोन कचरा स्पेशल लोकल आणण्यासाठी मध्य रेल्वेची धावपळ सुरू आहे. रुळांवर आणि ट्रॅकच्या बाजूला असलेल्या नाल्यांमध्ये प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. त्याचप्रमाणे रेल्वेमार्गांवर मोठ्या प्रमाणात कामे केली जात असल्याने त्यातूनही बराच कचरा राहतो. हा कचरा उचलण्यासाठी आठवड्यातून बरेच वेळा मध्यरात्रीच्या सुमारास कचरा लोकल चालविली जाते आणि रुळांवरील कचरा यात टाकला जातो. पावसाळापूर्व सफाईत ही कचरा स्पेशल लोकल महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र दोन कचरा स्पेशल असलेल्या लोकल सध्या बंदच ठेवण्याची वेळ मध्य रेल्वेवर आली आहे. मध्य रेल्वेची मेन लाइन आणि हार्बरवर मिळून अशा दोन लोकल होत्या. या दोन्ही लोकल डीसी (१,५00 व्होल्ट डायरेक्ट करंट) परिवर्तनावर धावणाऱ्या होत्या. जून २0१५ मध्ये मध्य रेल्वेच्या सीएसटी-कल्याण, डोंबिवली मार्गावर डीसी-एसी परिवर्तन झाले. त्यामुळे या मार्गावर असलेली एक लोकलही हार्बर मार्गावर वळवण्यात आली. आता हार्बरवरही परिवर्तन झाल्याने हार्बर मार्गावरील दोन्ही कचरा स्पेशल लोकलही सायडिंगला ठेवण्यात येणार आहेत. कचऱ्यासाठी ट्रेन लवकरच ‘मरे’चे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले, की पावसाळ्यापूर्वी या कचरा स्पेशल लोकल आणण्याचा प्रयत्न असून त्यासाठी एसी परिवर्तनाच्या लोकल हव्यात. सध्या हार्बर एसी परिवर्तनावर सिमेन्स आणि रेट्रोफिटेड लोकल जरी धावत असल्या तरी कचरा स्पेशल म्हणून चालविण्यासाठी लोकल सध्या नाहीत. त्यामुळे या लोकल लवकर आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.