सणासुदीच्या काळात कचराप्रश्न पेटणार?, मुंबईबाहेरही शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 02:30 AM2018-09-10T02:30:57+5:302018-09-10T02:31:09+5:30
मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रियेची सक्ती, घोटाळेबाज ठेकेदारांच्या मुसक्या आवळणे व अशा अनेक प्रयोगांमुळे मुंबईत दररोज जमा होणाºया दोन हजार ३०० मेट्रिक टनची घट झाल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे.
शेफाली परब-पंडित
मुंबई : मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रियेची सक्ती, घोटाळेबाज ठेकेदारांच्या मुसक्या आवळणे व अशा अनेक प्रयोगांमुळे मुंबईत दररोज जमा होणाºया दोन हजार ३०० मेट्रिक टनची घट झाल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. मात्र, मुलुंडपाठोपाठ देवनार कचराभूमीचेही द्वार लवकरच बंद होत असताना, पर्यायी कचराभूमीची व्यवस्था अद्याप झालेली नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात मुंबईत कचरा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत.
मुंबईत दररोज ९,५०० मेट्रिक टन कचरा तयार होत होता. मात्र, कचºयाचा डोंगर वर्षागणिक वाढत असताना, कचराभूमीची क्षमता मात्र संपुष्टात आली आहे. यापैकी मुलुंडमधील कचराभूमी बंद करण्याचा प्रक्रिया सुरू झाली आहे, तर देवनार कचराभूमीदेखील पुढच्या महिन्यापासून बंद होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतच नव्हे, तर मुंबईबाहेरही पर्यायी कचराभूमी मिळविण्याचे पालिकेचे प्रयत्न फेल गेले आहेत. त्यामुळे मुंबईकडे केवळ कांजूरमार्ग कचराभूमीचा पर्याय उरला आहे.
जागेच्या अडचणीवर मात करण्यासाठी महापालिकेने दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणाºया गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्या आवारातच ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्याची सक्ती केली आहे. मात्र, समज देऊन, कारवाईचा बडगा दाखवूनही निम्म्या सोसायट्यांनी असहकार पुकारला आहे. तरीही अनेक प्रयोगांनंतर दररोज जमा होणाºया कचºयाचे प्रमाण आता सात हजार दोनशे मेट्रिक टन झाले आहे, परंतु पर्यायी कचराभूमी उपलब्ध होईपर्यंत दररोज जमा होणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.
>दररोज गोळा होणारा कचरा
२०१५ मध्ये साडेनऊ हजार मेट्रिक टन असलेले कचºयाचे प्रमाण २०१८ मध्ये सात हजार २०० मेट्रिक टनपर्यंत कमी झाले आहे. मुंबई महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात २,६०५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.