प्रवास करा, पण जरा सांभाळून; तीनही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 06:23 AM2023-04-01T06:23:53+5:302023-04-01T06:51:26+5:30
२ एप्रिल रोजी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, २ एप्रिल रोजी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे
कुठे? चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाउन धीम्या मार्गावर
कधी? सकाळी १०. ३५ ते दुपारी ३. ३५ वाजेपर्यत
परिणाम : या ब्लॉकदरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. तसेच काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील.
कुठे? ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर
कधी? सकाळी १०. ४० ते दुपारी ३.४० पर्यंत
परिणाम : या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या वेळापत्रकाच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
कुठे? पनेवल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर
कधी? सकाळी ११. ०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत बेलापूर, पनवेल येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेल करीता जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील.