मुंबई : मुंबई शहर व उपनगरात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असून सध्या त्याची चांगलीच किंंमत वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांना मोजावी लागत आहे. मुंबईत जवळपास १00पेक्षा जास्त ठिकाणी खड्डे असल्याचे समोर आले आहे. या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी झाला असून प्रवास वेळ एक तासाने वाढल्याचे वाहतूक पोलीस सांगतात. यातून वाहनचालकांची सुटका करताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करू, असे आश्वासन पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले होते. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्याची कामे करण्यात आल्यानंतरही पावसाळ्यात पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण झाली आणि अनेक ठिकाणी पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य दिसून आले. दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होत असताना रस्ते कायमस्वरूपी खड्डेमुक्त करण्याचे तंत्रज्ञान पालिकेने अद्याप तरी अवगत केलेले नाही. त्यामुळे त्याची मोठी किंमत मुंबईतील वाहनचालकांना मोजावी लागत आहे. पडत असलेला पाऊस आणि त्यातच रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांना बरीच कसरत करावी लागत असल्याचे दिसते. वाहतूक पोलिसांनी खड्डे असलेल्या ठिकाणांची यादीच तयार केली असून अशा ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जवळपास १00पेक्षा जास्त ठिकाणी खड्डे असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. खड्डे असलेल्या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ न देणे, वाहनांची या मार्गांवरून लवकरात लवकर सुटका करणे इत्यादी कामे वाहतूक पोलिसांकडून केली जात आहेत. याबाबत सह पोलीस आयुक्त (वाहतूक) मिलिंद भारांबे यांनी सांगितले की, खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा प्रवास अर्धा ते एक तासाने वाढला आहे. वाहतूककोंडी होण्याबरोबरच वाहने बंद पडण्याचे प्रकारही होत आहेत. यातून सुटका करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात आहेत. ज्या-ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते बुजवण्यात यावेत यासाठी आम्ही पालिकेच्याही संपर्कात असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)>कुलाबा : सुंदर महल, मंत्रालय जंक्शन, जहांगीर आर्ट गॅलरी, एअर इंडिया जक्शन, गेट वे आॅफ इंडिया जंक्शनआझाद मैदान : गेट नंबर १८, पीडीमेलो रोड, अवतारसिंग शेरे ए पंजाब, बॅलार्ड पियर, अप्पासाहेब दौंडकर, भाटीया बाग, मनिष मार्केटसमोर, पी.एम. रोडकाळबादेवी : विगास स्ट्रीट ते काळबादेवी, कॉटन एक्सेंज, आनंदभुवन हॉटेल काळबादेवी रोड, अलंकार सिग्नल काळबादेवी, एसव्हीपी रोड. पायधुनी : कर्नाक बंदर जंक्शन, कर्नाक बंदर ब्रिज, साबूसिद्धी, सुंदरलाल काटा, मायलेट बंदर ते वाडी बंदर, जे.जे. ब्रिज दोन्ही बाजूने.ताडदेव : ताडदेव रोड, पेडर रोड, बीडी रोड, आॅगस्ट क्रांती, केम्स कॉर्नर, स्टिफन चर्च, जेडी रोड, केके रोड.नागपाडा : साने गुरुजी रोड ते चिंचपोकळी, महालक्ष्मी थिफ रोड, नायर रोड ते मुंबई सेंट्रल.भायखळा : बॅरीस्टर नाथ पै मार्ग, संत साईबाबा मार्गभोईवाडा :सुपारी बाग जंक्शन ते रेल्वे वर्कशॉप, हिंदमाता ब्रिज ते चित्रा सिनेमा, जगन्नाथ शंकर शेठ ब्रिज ते हिंदमाता, कृष्णानगर जंक्शन ते भारतमाता जंक्शन, करी रोड ते भारतमाता जंक्शन.माहीम : वांद्रे-सायन लिंक रोड धारावी डेपोच्या मागे, सायन स्टेशन ते वाय जंक्शन, ९0 फिट, ६0 फिट रोड, कटारिया ब्रिज मार्ग, सेनापती बापट मार्ग, एल.जे. रोड.माटुंगा : सायन हॉस्पिटल ब्रिज, गांधी मार्केट दोन्ही बॉण्ड, सायन हॉस्पिटल जंक्शन, प्रतीक्षानगर, मक्का वाडी जंक्शन, मुकेश जाधव चौक, डॉ. नानालाल मेहता ब्रिज, जगन्नाथ शंकर शेठ ब्रिज.दादर : कोतवाड गार्ड बस स्टॉपसमोर, प्लाझा सिनेमा, केशवसुत ब्रिज, सेनापती बापट मार्ग, एस.के. बोले रोड, सिद्धिविनायक मंदिर, गोखले रोड, पोर्तुगीज जंक्शन, एसव्हीएस रोड जंक्शन.ट्रॉम्बे : आर.सी. मार्ग, शंकर देऊळ, इस्लामपूर नाला, डायमंड गार्डन, आर.के. चौक, फ्री वे बोगदा ते पांजरपोळ जंक्शन, बोरबा देवी जंक्शन. मानखुर्द : मानखुर्द टी. जंक्शन ब्रिजखाली, मानखुर्द ब्रिज साऊथ बॉण्ड.कुर्ला : रझा चौक ते मिठी नदी ब्रिज, कल्पना जंक्शन एलबीएस रोड, सुर्वे जंक्शन, कुर्ला बस डेपोसमोर, मायकल शाळेसमोर. साकीनाका : आयआयटी मेन गेटसमोर, पवई प्लाझा जंक्शन, एनटीपीसी जंक्शन, खैरानी जंक्शन, एमटीएनएल जंक्शन, साकीनाका जंक्शन, अंधेरी-कुर्ला रोड, पिकनिक हॉटेलसमोर.मुलुंड : दर्गा रोड सोनापूर, व्हिलेज रोड ते टँक रोड जंक्शन, पन्नालाल कम्पाउंडसमोर, संभाजीनगर. सहार : सिगारेट फॅक्टरी, बहार जंक्शन, वे. हायवे नॉर्थ साऊथ बॉण्ड, कोंडीविटा, महालक्ष्मी गॅप, जे.बी. नगर, मरोळ नाका, सर्व्हिस रोड, एमव्ही रोड. वाकोला : हसमोग्रा दोन्ही बॉण्ड, वाकोला जंक्शन दोन्ही बॉण्ड, रामनगर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे दोन्ही बॉण्ड, हनुमान रोड लाइट सिग्नल, सँटोर ब्रिज, आग्रीपाडा सब वे, नानानानी पार्कजवळ.दिंडोशी : आॅबेरॉय मॉल जंक्शन टर्निंगजवळ, सिबा रोड जंक्शन, वागेश्वरी मंदिरासमोर, रत्नागिरी जंक्शन. मालाड : मामलेदार वाडी जंक्शन, एमटीएनएल जंक्शन ते वासरी हिल, राममंदिर जंक्शन ते मूव्ही स्टार सिनेमा, झरना गॅस, भगतसिंह रोड नं.२, आदर्श डेअर जंक्शन.बोरीवली : अहिरे हॉटेल लिंक रोड, रोकडिया लेन, एसव्ही रोड, लिंक रोड, आर.एस. भट रोड, रोकडिया क्रॉस लेन, चंदावरकर लेन.
खड्ड्यांमुळे प्रवास एक तासाने वाढला
By admin | Published: July 22, 2016 3:20 AM