मुंबईच्या पोटातून प्रवास...; वाहतुकीसाठी निर्माण होणार बोगद्यांचे जाळे, समिती स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 12:50 PM2023-10-13T12:50:36+5:302023-10-13T12:52:41+5:30

मुंबईतली वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील वाहतूक प्रकल्प बळकट करण्यावर जोर देण्यात येत आहे. या प्रकल्पांमध्ये कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्पांचा समावेश आहे.

Travel through the belly of Mumbai A network of tunnels will be created for transportation, a committee will be formed | मुंबईच्या पोटातून प्रवास...; वाहतुकीसाठी निर्माण होणार बोगद्यांचे जाळे, समिती स्थापन

मुंबईच्या पोटातून प्रवास...; वाहतुकीसाठी निर्माण होणार बोगद्यांचे जाळे, समिती स्थापन


मुंबई : लोकल, मेट्रो, बेस्टची बस, टॅक्सी यासारख्या वाहनांनी प्रवास करून मुंबईकर आपापली कार्यालये गाठत असतात. भुयारी मेट्रोही नजीकच्या भविष्यात सेवेत रुजू होईल. मात्र, मुंबईकरांचा प्रवास अधिकाधिक सुलभ व्हावा यासाठी आता चक्क मुंबईच्या पोटातूनच प्रवास करण्यासाठी जमिनीखाली बोगद्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. त्यासाठीचा शासन निर्णय (जीआर) झाला असून महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

मुंबईतली वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील वाहतूक प्रकल्प बळकट करण्यावर जोर देण्यात येत आहे. या प्रकल्पांमध्ये कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्पांचा समावेश आहे. शिवाय प्रवाशांच्या सुलभतेची मागणी पूर्ण करण्यासाठी जमिनीखालील प्रकल्पांवर भर दिला जात आहे. 

मुंबई महानगर प्रदेशासह संपूर्ण मुंबईतील विस्तारित कनेक्टिव्हिटीसह एकात्मिक मास्टर प्लॅन तयार करून मुंबईतल्या बोगद्यांच्या नेटवर्कसाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पायाभूत सुविधा या विषयांवर काम करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, अलीकडेच स्थापन करण्यात आलेले राज्य पायाभूत सुविधा महामंडळ आणि शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग असतानाही मुंबई महानगरपालिकेकडे हे काम सोपविण्यात आले आहे.

अभ्यास खर्च पालिका करणार
-    प्रकल्पासाठी नेटवर्क सिस्टमचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी केलेल्या अभ्यासाचा खर्च महापालिका करणार आहे.
-    समितीत महापालिका आणि एमएमआरडीएच्या आयुक्तांसह एमएसआरडीसी आणि पालिकेच्या अभियंत्यांचा समावेश आहे.

समितीची उद्दिष्टे 
- वाहतूक बोगद्याच्या ठिकाणे निश्चिती करणे.
- रहदारीला प्राधान्य 
देत त्या आधारावर बोगद्यांचे टप्पे निश्चित करणे.
- आपत्कालीन पूर मदत म्हणून स्मार्ट बोगद्याच्या संकल्पना शोधणे.

- युटिलिटी कॉरिडॉरचे एकत्रीकरण करणे.
- पर्यावरणीय प्रभावाचा अभ्यास करणे.
- बोगद्यांसाठी कालमर्यादा निश्चित करणे.

- स्मार्ट टनेल नेटवर्कचा मास्टर प्लॅन तयार करणे.
- डेकची संख्या, वाहतूक / पूर यांचे मूल्यमापन करणे.
- मास्टर प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी टप्पे तयार करणे.
 

Web Title: Travel through the belly of Mumbai A network of tunnels will be created for transportation, a committee will be formed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.