इंग्रजांच्या काळात सुरू झालेल्या शेवटच्या ११ दुमजलीतून प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 12:27 PM2023-07-20T12:27:49+5:302023-07-20T12:28:47+5:30

इंग्रजांच्या काळात सुरू झालेल्या बेस्टच्या ताफ्यात ११ साध्या डबलडेकर बस आहेत.

Travel through the last 11 double-deckers that started during the British era! | इंग्रजांच्या काळात सुरू झालेल्या शेवटच्या ११ दुमजलीतून प्रवास!

इंग्रजांच्या काळात सुरू झालेल्या शेवटच्या ११ दुमजलीतून प्रवास!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईची ऐतिहासिक साधी डबलडेकर बस लवकरच नामशेष होणार आहे. शेवटच्या ११ दुमजली बस मुंबईच्या रस्त्यांवरून धावत असून, या गाड्यांचे आयुर्मान संपल्यामुळे त्या भंगारात काढल्या जाणार आहेत. या गाड्यांची संख्या कमी झाल्याने अपुऱ्या बसेसअभावी प्रवाशांचे हाल होत आहेत.
इंग्रजांच्या काळात सुरू झालेल्या बेस्टच्या ताफ्यात ११ साध्या डबलडेकर बस आहेत.

गाड्यांना ऐतिहासिक लौकिक प्राप्त झाला असून, लवकरच कालबाह्य होणार आहेत. त्यांची जागा एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बस घेणार आहे. मुंबईतील बस मार्ग क्रमांक ३१०, ३३२, ४१५ वरून सध्या डबलडेकर बस चालविली जात आहे. डबलडेकर बसच्या अपुऱ्या संख्येने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच बेस्टच्या ताफ्यात १२ एसी डबलडेकर बस असून, केवळ कुलाबा आगारात आहेत. बेस्टच्या ताफ्यात आणखी डबलडेकर बस येणार आहेत. मात्र, त्या अद्याप प्राप्त न झाल्याने इतर गाड्यांवर त्याचा ताण येत आहे.

Web Title: Travel through the last 11 double-deckers that started during the British era!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.