लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईची ऐतिहासिक साधी डबलडेकर बस लवकरच नामशेष होणार आहे. शेवटच्या ११ दुमजली बस मुंबईच्या रस्त्यांवरून धावत असून, या गाड्यांचे आयुर्मान संपल्यामुळे त्या भंगारात काढल्या जाणार आहेत. या गाड्यांची संख्या कमी झाल्याने अपुऱ्या बसेसअभावी प्रवाशांचे हाल होत आहेत.इंग्रजांच्या काळात सुरू झालेल्या बेस्टच्या ताफ्यात ११ साध्या डबलडेकर बस आहेत.
गाड्यांना ऐतिहासिक लौकिक प्राप्त झाला असून, लवकरच कालबाह्य होणार आहेत. त्यांची जागा एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बस घेणार आहे. मुंबईतील बस मार्ग क्रमांक ३१०, ३३२, ४१५ वरून सध्या डबलडेकर बस चालविली जात आहे. डबलडेकर बसच्या अपुऱ्या संख्येने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच बेस्टच्या ताफ्यात १२ एसी डबलडेकर बस असून, केवळ कुलाबा आगारात आहेत. बेस्टच्या ताफ्यात आणखी डबलडेकर बस येणार आहेत. मात्र, त्या अद्याप प्राप्त न झाल्याने इतर गाड्यांवर त्याचा ताण येत आहे.