Join us

चला उपनगरातही करा गारेगार प्रवास, १० एसी डबलडेकर एसी बस येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 9:27 AM

१० एसी इलेक्ट्रिक डबलडेकर येणार.

मुंबई : शहराच्या उपनगरात राहणाऱ्या प्रवाशांची निकड लक्षात घेता, बेस्ट उपक्रमातर्फे एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसगाड्या मुंबईच्या उपनगरातही चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, १० नवीन एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसगाड्या ३१० या बस मार्गावर वांद्रे बस टर्मिनस ते कुर्ला स्टेशन पश्चिम बस स्थानक या दरम्यान सुरूकरण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाकडून घेतलेला आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील प्रवाशांनाही एसी डबल डेकर बसचा आरामदायी प्रवास घडणार आहे.मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी  बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २१ फेब्रुवारीपासून वातावरणपूरक एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसगाड्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत, बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये सध्या एकूण ४९ इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या दाखल झाल्या असून, त्यापैकी २५ बसगाड्या दक्षिण मुंबईत सुरू करण्यात येत आहेत.

चांगला प्रतिसाद :

एसी बसगाड्यांना मुंबईतील प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिलेला असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे त्या आता उपनगरातही सुरू करण्यात आल्या आहेत. 

 

कमी बसभाड्यात आरामदायी प्रवास :

 या बसगाड्या पर्यावरणपूरक असून, या बस गाड्यांमधून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायुप्रदूषण होत नाही. एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसगाडीमध्ये दोन्ही बाजूने स्वयंचलित प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होत आहे, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने बसगाडीमध्ये सीसीटीव्हींची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 याशिवाय प्रवाशांच्या सोयीकरिता मोबाइल चार्जिंग व्यवस्था या बसगाड्यांमध्ये असून, प्रवाशांना या दुमजली बसगाड्यांतून प्रवास करताना, इतर सार्वजनिक परिवहनसेवेच्या तुलनेने कमी बसभाडे प्रदान करावे लागत आहे.

टॅग्स :मुंबईबेस्ट