शनिवारपासून प्रवासही महागणार; रिक्षाची २, तर टॅक्सीची ३ रुपयांनी होणार भाडेवाढ, पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 06:26 AM2022-09-29T06:26:50+5:302022-09-29T06:27:20+5:30

मीटर अद्ययावत करण्यास दोन महिन्यांची मुदत 

Travel will also become expensive from Saturday Rickshaw fare will be increased by Rs 2 and taxi by Rs 3 see the new rates | शनिवारपासून प्रवासही महागणार; रिक्षाची २, तर टॅक्सीची ३ रुपयांनी होणार भाडेवाढ, पाहा नवे दर

शनिवारपासून प्रवासही महागणार; रिक्षाची २, तर टॅक्सीची ३ रुपयांनी होणार भाडेवाढ, पाहा नवे दर

googlenewsNext

मुंबई :  मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रातील रिक्षांच्या किमान भाड्यात दोन, तर टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्याच्या निर्णयाला एमएमआरटीएने (मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण) मंजुरी दिल्याने १ ऑक्टोबरपासून भाडेवाढ लागू होईल. त्याचवेळी मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआरडीए) सर्व ठिकाणी पेट्रोल रिक्षांना सीएनजीच्या दरानुसारच भाडेवाढ मिळेल. तसेच त्यांनी सीएनजीनुसार भाडे आकारावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या भाडेवाढीमुळे रिक्षांचे पहिल्या टप्प्याचे दर २१ रुपयांवरून २३ रुपये होतील. काळी-पिवळी टॅक्सीचे पहिल्या टप्प्याचे २५ रुपयांवरून २८ रुपये होतील. खटुआ समितीच्या शिफारशीच्या आधारे सध्याचा महागाई निर्देशांक, वाढलेले इंधनाचे दर, इतर संबंधित बाबी विचारात घेऊन ही भाडेवाढ करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

मीटर अद्ययावत करण्यास दोन महिन्यांची मुदत 
रिक्षा-टॅक्सी चालकांना नव्या भाड्यासाठी मीटर अद्ययावत करता यावे, यासाठी दोन महिन्यांचा म्हणजेच ३० नोव्हेंबरपर्यंतचा काळ देण्यात आला आहे. तोपर्यंत अधिकृत पत्रक जवळ ठेवून रिक्षा-टॅक्सी चालकांना सुधारित भाडे आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कूल कॅबला ७ रुपये भाडेवाढ  
कूल कॅब (एसी टॅक्सीसाठी) किमान १.५ किमीच्या पहिल्या टप्प्यासाठी ३३ रुपये इतका दर होता. त्यात वाढ होऊन तो आता ४० रुपये होईल.

नवीन दर
वाहन प्रकार     पहिला टप्पा     पुढील प्रत्येक 

                       किमान भाडे       किमीसाठी (रुपये)
रिक्षा                       २३                  १५.३३    
टॅक्सी                      २८                 १८. ६६ 
कूल कॅब                 ४०                 २६.७१

सध्याचे दर 
वाहन प्रकार     पहिला टप्पा     पुढील प्रत्येक 

                        किमान भाडे       किमीसाठी (रुपये)

रिक्षा                       २१                   १४.२०    
टॅक्सी                      २५                  १६. ९३ 
कूल कॅब                 ३३                  २२. २६

Web Title: Travel will also become expensive from Saturday Rickshaw fare will be increased by Rs 2 and taxi by Rs 3 see the new rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.