प्रवासी संख्या वाढीसाठी मेट्रो प्रशासन उतरवणार प्रवाशांचा विमा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 02:35 AM2018-12-31T02:35:57+5:302018-12-31T02:36:07+5:30
मुंबईतील पहिली आणि एकमेव मेट्रो घाटकोपर ते वर्सोवादरम्यान सुरू आहे. या मेट्रो मार्गावर प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी मेट्रो १ प्रशासनाने प्रवाशांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : मुंबईतील पहिली आणि एकमेव मेट्रो घाटकोपर ते वर्सोवादरम्यान सुरू आहे. या मेट्रो मार्गावर प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी मेट्रो १ प्रशासनाने प्रवाशांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षात २६ जानेवारीपर्यंत या मार्गावर जो प्रवासी १०० किमीचा प्रवास पूर्ण करेल त्याचा साडेचार लाखांचा विमा उतरविण्यात येईल. ही योजना मेट्रो १ वर प्रवास करणाऱ्या मासिक पास आणि मेट्रो स्मार्ट कार्ड बाळगणाºया प्रवाशांपुरतीच मर्यादित ठेवण्यात आली आहे.
घाटकोपर ते वर्सोवादरम्यान धावणाºया मेट्रो १ रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. २०१८ मध्ये मेट्रोने प्रवास करणाºया प्रवाशांमध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दररोज या मार्गावरून साडेतीन लाख प्रवासी प्रवास करतात. तरीही प्रवाशांची संख्या आणखी वाढावी यासाठी मेट्रो १ प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठीच प्रवाशांचा थेट विमा उतरविण्याची तयारी मेट्रो-१ प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
रॉयल्टी प्रोग्रामअंतर्गत मासिक पास आणि स्मार्ट कार्डधारकांना १० किलोमीटरच्या प्रवासासाठी १ पॉइंट देण्यात येईल. २६ जानेवारीपर्यंत जो प्रवासी १०० किमीचा प्रवास करून १० पॉइंटची कमाई करेल त्याचा ४.५ लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात येईल. हा विमा एका वर्षासाठी असेल, असे मेट्रो प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
मेट्रो प्रवाशांची संख्या अंधेरी ते साकीनाकादरम्यान सर्वाधिक आहे. ही प्रवासी संख्या आणखी वाढवण्यासाठी या मार्गात येणाºया आणि मेट्रोने प्रवास करणाºया ४५० कंपन्यांमधील कर्मचाºयांना त्यांचा मेट्रोचा मासिक पास त्यांच्या कंपन्यांमध्ये थेट उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही मेट्रो करणार आहे.