Join us

प्रवाशांना कळणार बस येण्याची ‘बेस्ट’ वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 3:14 AM

प्रकल्पासाठी ११० कोटींचा खर्च अपेक्षित : पहिल्या टप्प्यात प्रशासनाकडून तीन कोटी

मुंबई : बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेमुळे त्रासलेल्या प्रवाशांना आता ‘बेस्ट’ टाइम कळणार आहे. बस किती मिनिटांत येईल, याची अचूक माहिती देणारे तंत्रज्ञान अखेर बेस्ट उपक्रम आणणार आहे. या प्रकल्पासाठी ११० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याने बेस्ट उपक्रमाने महापालिकेकडे मदत मागितली आहे. विशेष म्हणजे, बेस्ट उपक्रमाला आतापर्यंत आर्थिक साहाय्य देण्यास हात आखडता घेणाऱ्या पालिका प्रशासनाने या वेळेस पहिल्या टप्प्यात तीन कोटी रुपये देण्याची तयारी दाखविली आहे.

बेस्टच्या बसगाड्या वाहतूककोंडीमध्ये अडकून पडत असल्याने, प्रवाशांना बस थांब्यावर तासन्तास वाट पाहावी लागते. गेल्या काही वर्षांमध्ये वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने, प्रवाशांनीही बेस्ट बसची वाट बघणे सोडले आहे. त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी; शिवाय अशा प्रवाशांना पुन्हा बेस्ट बसकडे वळविण्यासाठी इम्टेजिट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सीस्टिम (आयटीमएमएस) यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. त्यामुळे बस किती वेळात बस थांब्यावर येईल, याची अचूक माहिती प्रवाशांना मिळेल. या अद्ययावत यंत्रणेची अंमलबजावणी बेस्ट उपकमात सुरूदेखील झाली आहे. यामध्ये बेस्टचे ट्रान्झिट आॅपरेशन, बेस्टची नामावली, नियोजन आणि अनुसूची, आगार आणि कार्यशाळा देखभाल, आदेश देणे आणि नियंत्रण कक्षाचे काम, मोबाइल अ‍ॅप इत्यादी वाहतूक विभागाशी संबंधित सर्व कार्य पार पडेल. त्यासाठी ११० कोटी २४ लाख इतका खर्च होणार आहे. पहिल्या टप्प्यात बसमध्ये एलईडी डिस्प्ले सीस्टिम, तर बस थांब्यांवर एलईडी सीस्टिम बसविणे, बसगाड्यांवर व्हेइकल ट्रेकिंग सीस्टिम बसविणे इत्यादी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांचे तीन कोटी सात लाख रुपये महापालिका देणार आहे.यासाठी अद्ययावत यंत्रणाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना बस नेमकी कधी येईल, याची अचूक माहिती मिळेल; तसेच आगार, गाड्यांचा ताफा, कार्यशाळा याचेही नियोजन करण्यात येईल. च्फेºयांचे नियोजन, वेळापत्रक, प्रवासी नोंदणी, वाय-फाय, सीसीटीव्ही, कर्मचाºयांची उपस्थिती, आगारातून बस बाहेर पडण्याची-येण्याची वेळ, वेग, ठिकाण आदींची माहिती संग्रहित होणार आहे. बेस्ट व्यवस्थापनास नियोजनासाठी त्याचा फायदा होईल. च्एखाद्या थांब्यावर प्रवाशांची संख्या अधिक असल्यास, तेथे जादा फेºया पाठविणेही शक्य होईल.

टॅग्स :मुंबईबेस्ट