पर्यायी मार्गांमुळेच वाहतूककोंडी सुटेल

By Admin | Published: April 30, 2015 01:50 AM2015-04-30T01:50:12+5:302015-04-30T01:50:12+5:30

वाढत्या वाहनांमुळे मुंबईतील वाहतुकीची वाढती कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय निर्माण करणे आवश्यक बनले आहे,

Travelers will leave due to alternative routes | पर्यायी मार्गांमुळेच वाहतूककोंडी सुटेल

पर्यायी मार्गांमुळेच वाहतूककोंडी सुटेल

googlenewsNext

मुंबई : वाढत्या वाहनांमुळे मुंबईतील वाहतुकीची वाढती कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय निर्माण करणे आवश्यक बनले आहे, असे मत देशभरातील मेट्रो तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले. महानगरातील प्रस्तावित कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाची कृती व देखभाल धोरण ठरविण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून बुधवारी परिषद घेण्यात आली. त्यामध्ये देशभरातील विविध मेट्रो प्रकल्पांतील अधिकारी व तज्ज्ञांचा समावेश होता.
मुंबईत २०२०मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा असलेल्या मेट्रो-३ मधील विविध मार्गांसाठीचे पर्याय या कार्यशाळेत मांडण्यात आले. बदललेल्या दळणवळण व्यवस्थेत मेट्रो रेल्वे ही अत्यावश्यक बाब बनली आहे. मात्र त्यांचे प्रकल्प राबविताना नेमकी कृती व देखभाल धोरणाची निश्चिती असल्यास ते दीर्घकाळ उपयुक्त ठरू शकते, अन्यथा त्यामध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याची भीती या वेळी व्यक्त करण्यात आली.
मेट्रो- ३ साठी कृती व देखभाल (आॅपरेशन्स आणि मेन्टेनन्स) करण्यासाठी योग्य धोरणे पडताळून पाहणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता़ त्यानुसार दिवसभरात झालेल्या चर्चासत्रांत प्रकल्पासाठीच्या प्रशासकीय, तांत्रिक, वैधानिक, कायदेशीर व आर्थिक आव्हानांवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. या वेळी महानगर आयुक्त यू.पी.एस.मदान म्हणाले, की जगभरातील मेट्रो प्रकल्प सरकार किंवा खासगी संस्थांमार्फत चालविले जातात. मुंबईतील वाहतुकीचा विचार करताना कुठला पर्याय योग्य आहे याचा निर्णय येथील परिस्थितीचा अभ्यास करून केला जाण्याची गरज आहे. या वेळी दिल्ली मेट्रोचे रेल कॉपोरेशनचे कार्यकारी संचालक विकास कुमार म्हणाले, की कृती व देखभालीवरील खर्च
वगळता दिल्ली मेट्रो ही जगातील तिसऱ्या क्रमांकातील फायद्यातील मेट्रो असून ती पूर्णपणे दिल्ली रेल कॉपोरेशनकडून राबविण्यात आलेली आहे.
या वेळी कृती व देखभालीसाठी इन हाऊस पद्धतीचा वापर केल्यास खर्च व सोयीसुविधांवर नियंत्रण ठेवता येत असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

अभ्यासाची गरज
मुंबई रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे म्हणाल्या, वाहतुकीची बदलती साधने आणि स्थानिक परिस्थितीचा सर्वांगिण अभ्यास करुन मेट्रो प्रकल्प राबविण्यावर विचार केला जाण्याची गरज आहे. त्यानुषंगाने आजची परिषद उपयुक्त ठरणारी आहे.

Web Title: Travelers will leave due to alternative routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.