Join us  

सहा महिन्यांत 5 कोटी प्रवाशांचा प्रवास

By admin | Published: December 12, 2014 1:11 AM

अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या मेट्रोने आता एक नवीनच रेकॉर्ड केला आहे. सहा महिन्यांत तब्बल 5 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे.

मुंबई : अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या मेट्रोने आता एक नवीनच रेकॉर्ड केला आहे. सहा महिन्यांत तब्बल 5 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. 
4,5क्क् कोटी रुपये खर्चून 8 जून रोजी घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. मेट्रो मुंबईकरांच्या पसंतीस उतरावी यासाठी मेट्रोचे भाडे फक्त 1क् रुपये ठरवण्यात आले. कुठल्याही स्थानकार्पयतच्या प्रवासासाठी फक्त 1क् रुपये आकारणी केली जात असल्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरवासीयांनी मेट्रोचा पुरेपूर आनंद लुटला. महिनाभरासाठी 1क् रुपये आकारणी असल्याने मेट्रो प्रशासनाला याचा पुरेपूर आर्थिक फायदाही झाला. मेट्रो सुरू झाल्यावर सुरुवातीला रोज प्रवास करणा:या प्रवाशांची संख्या 2 लाख 4क् हजार एवढी होती. त्यानंतरच्या काही दिवसांत हा आकडा वाढून 3 लाख झाला. तर शनिवार आणि रविवारी येणा:या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याने प्रवाशांचा आकडा आणखीच वाढून तो 5 लाख एवढा झाला. त्यामुळे सुरुवातीला मेट्रोतून 1 कोटी प्रवाशांनी प्रवास केला. आता हीच आकडेवारी वाढली असून, सहा महिन्यांत 5 कोटी प्रवाशांनी प्रवास केल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले आहे. मेट्रोने प्रत्येक दिवशी 99 टक्के चांगली सेवा दिल्याचे सांगण्यात आले.   (प्रतिनिधी)
 
सहा महिन्यांत 5 कोटी प्रवाशांनी प्रवास केल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले आहे. मेट्रोने प्रत्येक दिवशी 99 टक्के चांगली सेवा दिली.