चिमुकल्याला घेऊन रेल्वे प्रवास होणार सुखकर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 03:43 PM2023-05-17T15:43:07+5:302023-05-17T15:43:27+5:30

स्तनदा मातांच्या तक्रारी आणि सूचना रेल्वेला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यासाठी ‘ममता कक्ष’ सुरू करण्यात आले आहे.

Traveling by train will be pleasant with a toddler | चिमुकल्याला घेऊन रेल्वे प्रवास होणार सुखकर

चिमुकल्याला घेऊन रेल्वे प्रवास होणार सुखकर

googlenewsNext


मुंबई : बाळाला घेऊन रेल्वे प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना रेल्वेस्थानकात बाळाला स्तनपान करणे सोईस्कर व्हावे, यासाठी मध्य रेल्वेकडून १३ स्थानकांत ममता कक्ष सुरू करण्यात आले आहेत. बाळासह प्रवास करणाऱ्या मातांची गर्दीच्या ठिकाणी, रेल्वेस्थानकावर मोठी गैरसोय होते. लहानग्यांचे डायपर बदलतानादेखील महिला वर्गाची अडचण होते. रेल्वेस्थानकांतील स्वच्छतागृहांची अवस्था नेहमी बिकट असते. तेथील अस्वच्छता, दुर्गंधी यामुळे त्या ठिकाणी थांबणे शक्य होत नाही. यामुळे महिला वर्गाची मोठी कुचंबणा होत असते. स्तनदा मातांच्या तक्रारी आणि सूचना रेल्वेला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यासाठी ‘ममता कक्ष’ सुरू करण्यात आले आहे.

स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी त्यांच्या प्रवासादरम्यान सुरक्षित आणि आरामदायक जागा उपलब्ध  करण्यासाठी, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिसनस, दादर (३), लोकमान्य टिळक टर्मिनस (३), ठाणे (२), कल्याण, पनवेल आणि लोणावळा (२) असे १३ कक्ष (पॉड्स) बसविण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. नॉन फेअर रेव्हेन्यूअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. हे कंत्राट मेसर्स बुलस आय मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे. नर्सिंग पॉड्स ही उपरोक्त स्थानकांवर एक प्रवासी सुविधा आहे जी प्रवास आणि ट्रेन बदल करण्याच्या दरम्यान प्रतीक्षा कालावधीत बाळांच्या आहारासाठी सुरक्षित, मोफत, स्वच्छतापूर्ण जागा प्रदान करेल. नर्सिंग पॉड्सचा वापर विनामूल्य असेल तसेच नर्सिंग पॉड्समध्ये प्रदान केलेल्या डायपर चेंजिंग स्टेशनची सेवा/वापरदेखील विनामूल्य असेल.

Web Title: Traveling by train will be pleasant with a toddler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.