'घोड्यावरुन प्रवास केल्याने आदळआपट होते, मणक्याचा त्रास वाढण्याची दाट शक्यता'

By महेश गलांडे | Published: March 4, 2021 12:52 PM2021-03-04T12:52:21+5:302021-03-04T12:53:45+5:30

विशेष म्हणजे महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनीही संदर्भातील प्रश्नांवर लगेचच उत्तर दिलं आहे. संदर्भीय पत्रानुसार अस्थिव्यंगोपचार शास्त्र यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, पाठीच्या कण्याचा त्रास असलेल्या व्यक्तीने घोड्यावरून प्रवास केल्यास आदळआपट होते

Traveling on horseback can lead to collisions, with increased risk of spinal cord injury, nanded collector office | 'घोड्यावरुन प्रवास केल्याने आदळआपट होते, मणक्याचा त्रास वाढण्याची दाट शक्यता'

'घोड्यावरुन प्रवास केल्याने आदळआपट होते, मणक्याचा त्रास वाढण्याची दाट शक्यता'

googlenewsNext
ठळक मुद्देनांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना  पत्र लिहून विचारणा केली आहे. घोड्यावर बसल्यामुळे पाठीच्या कण्याचा त्रास कमी होतो किंवा कसे?

मुंबई - नांदेडच्या सहायक लेखाधिकाऱ्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे घोडा बांधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सहायक लेखाधिकाऱ्याने जिल्हाधिकारी यांना आणखी एक अर्ज केला आहे. त्यामुळे, नांदेडमधील या अर्जाची चांगलीच चर्चा रंगली आहे. सतीश देशमुख असं या कर्मचाऱ्याचं नाव असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. ते सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे कार्यरत आहेत. आपल्याला पाठीचा त्रास होत असल्यामुळे कार्यालयात दुचाकीवरून येण्यास समस्या निर्माण होत असल्याचं त्यांनी पहिल्या पत्रात नमूद केलं होतं. देशमुख यांच्या पत्रानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यलयाशी पत्रव्यवहार केला आहे. 

नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना  पत्र लिहून विचारणा केली आहे. घोड्यावर बसल्यामुळे पाठीच्या कण्याचा त्रास कमी होतो किंवा कसे? याबाबत आपले अधिनस्त अस्थिरोग तज्ज्ञाचा अभिप्राय घेऊन या कार्यालयास पाठवावे, असे आपल्या पत्रात म्हटले आहे. कुलकर्णी यांनी आपल्या पत्रात सहायक लेखाधिकारी सतीश पंजाबराव देशमुख यांच्या पत्राचाही संदर्भ दिला आहे. 

विशेष म्हणजे महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनीही संदर्भातील प्रश्नांवर लगेचच उत्तर दिलं आहे. संदर्भीय पत्रानुसार अस्थिव्यंगोपचार शास्त्र यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, पाठीच्या कण्याचा त्रास असलेल्या व्यक्तीने घोड्यावरून प्रवास केल्यास आदळआपट होते, त्यामुळे मणका दबण्याची, मणक्यातील गादी दबण्याची किंवा सरकण्याची शक्यता असते. त्याने, पाठीच्या कण्याचा त्रास कमी न होता, वाढण्याची दाट शक्यता आहे, असे कळविण्यात आले आहे. 


सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून हे घटनेचे 4 ही पत्र शेअर केले आहेत. त्यासोबतच, शासकीय कार्यप्रणाली : एक उदाहरण... अशी मजेशीर कमेंटही त्यांनी केलीय.

अर्ज मागे

सध्या एक पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात कर्मचाऱ्यानं चक्क कार्यालयात आपण घोड्यावरून येणार असून घोडा उभा करण्यासाठी जागा मिळावी यासाठी कर्मचाऱ्यानं चक्क जिल्हाधिकारी कार्यालयालाच पत्र लिहिलं. मात्र, आता नवीन पत्र लिहून आपण आपली अर्ज मागे घेत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कार्यालयीन परीसरात घोडा बांधण्यासाठी, मी अर्ज दिला होता. तरी, या अर्जाद्वारे संदर्भीय अर्ज मागे घेत आहे, असे सतिश देशमुख यांनी म्हटलंय. त्यामुळे, घोडा बांधण्यासाठीचा अर्ज मागे घेण्यात आला आहे. सतिश यांनी नेमका कशामुळे हा अर्ज केला आणि पहिला अर्ज मागे घेतला याबाबत चर्चा व तर्कवितर्कांना उधाण आले आहे.      
 

Web Title: Traveling on horseback can lead to collisions, with increased risk of spinal cord injury, nanded collector office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.