मुंबई : ‘कृपया लक्ष द्या, लोकलमधून उतरताना गाडीचे पायदान आणि फलाटाच्या अंतरावर लक्ष द्या’ या सूचनेशिवाय सामान्य मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरू होत नाही. याच धर्तीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, लोकलच्या पायदानावरून प्रवास करून सामान्य प्रवाशांचे जीव धोक्यात घालणाऱ्या ५ हजार ९५९ प्रवाशांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) ही कारवाई केली असून दोषींकडून १८ लाखांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान विस्तार असलेल्या पश्चिम रेल्वेवर प्रवाशांकडून जीवघेणे स्टंट करण्याच्या तक्रारी विविध माध्यमांनी मिळत होत्या. शिवाय पायदानावर प्रवास करून स्थानकात अडवणूक करणाºया प्रवाशांमुळे देखील मनस्ताप सहन करावा लागत होता. लोकलमधील पायदानावर प्रवास करणाºया मुजोर प्रवाशांना धडा शिकवण्यासाठी पश्चिम रेल्वे आरपीएफने जानेवारी ते आॅगस्ट दरम्यान एकूण ५ हजार ९५९ प्रवाशांना बेड्या ठोकल्या. या प्रवाशांकडून एकूण १८ लाख ७० हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वे आरपीएफने दिली.बोरीवली ते विरार स्थानकात लोकलमधील दरवाजांवर उभे राहून प्रवेश अडवणाºया प्रवाशांविरोधात देखील आरपीएफने कूच केली. जानेवारी ते आॅगस्ट दरम्यान १ हजार ४८३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.पश्चिम रेल्वेवर सध्या रोज १ हजार ३५५ फेºया चालवण्यात येतात. नोव्हेंबरपासून या फेºयांमध्ये १० अतिरिक्त फेºया सुरू करण्याचाप्रयत्न पश्चिम रेल्वे करत आहे. यामुळे दरवाजे अडवून स्टंट करणाºया प्रवाशांसह लोकलमधील पायदानावर प्रवास करणाºया प्रवाशांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यातयेणार असल्याची माहिती रेल्वेसुरक्षा बलाचे वरिष्ठ विभागीयसुरक्षा आयुक्त अनुप शुक्ला यांनी दिली.पश्चिम रेल्वेवरील स्टंटच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येणार आहे. यानुसार सर्वप्रथम लोकलवरील पायदानावर उभे राहून प्रवास करणाºया प्रवाशांवर कारवाई करण्यात येईल. आॅगस्टपर्यंत लोकलमध्ये पायदानावर प्रवास करणाºया सुमारे सहा हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. साध्या वेशातील जवानांसह महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांच्या मदतीने ही कारवाई करण्यात येत असून येणाºया काळात कारवाईसाठी अधिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल. - अनुप शुक्ला, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, पश्चिम रेल्वे
लोकलच्या ‘पायदाना’वरून प्रवास; कारवाईचा ‘फास’, ६ हजार प्रवाशांकडून १८ लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 6:05 AM