ट्रॅव्हल्सचा प्रवास महागला; पर्यटनासाठी जाणाऱ्यांची गर्दी, बस, रेल्वेचे आरक्षण फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 10:16 AM2023-12-25T10:16:07+5:302023-12-25T10:16:58+5:30

शाळा, महाविद्यालयांना नाताळची सुटी पडली असून, नोकरदारांना सलग सुट्या लागून आल्या आहेत.

Travels are expensive are increased crowd of people going for tourism bus railway reservation is full | ट्रॅव्हल्सचा प्रवास महागला; पर्यटनासाठी जाणाऱ्यांची गर्दी, बस, रेल्वेचे आरक्षण फुल्ल

ट्रॅव्हल्सचा प्रवास महागला; पर्यटनासाठी जाणाऱ्यांची गर्दी, बस, रेल्वेचे आरक्षण फुल्ल

मुंबई :  शाळा, महाविद्यालयांना नाताळची सुटी पडली असून, नोकरदारांना सलग सुट्या लागून आल्या आहेत. त्यामुळे बहुसंख्य सहकुटुंब नववर्ष उत्साहात साजरा करण्यासाठी बाहेरगावी जात आहेत. त्यामुळे  रेल्वे, एसटी १०० टक्के आरक्षित झाल्या असून, खासगी बसने प्रवास करावा लागत. हीच संधी साधत ट्रॅव्हल्सवाल्यांनी प्रवास भाडे वाढविले आहे.

शनिवार आणि रविवारी आणि त्याला जोडून आलेली नाताळची सुटीची संधी साधून मोठ्या संख्येने मुंबईकर पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत.  विशेषतः गुहागर, दापोली, चिपळूण, गोवा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे येथे जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एसटी बस आगार, रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांत प्रचंड गर्दी वाढली आहे. 

ज्या प्रवाशांना नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांची आणि एसटीच्या जादा बसची आरक्षित तिकिटे मिळाली, त्यांचा प्रवास सुरू झाला. मात्र, ज्यांना आरक्षित तिकिटे मिळाली नाहीत, त्यांनी खासगी ट्रॅव्हलला पसंती दिली. 

१०० पेक्षा जास्त वेटींगवर :

सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसच्या तृतीय वातानुकूलित डब्याची प्रतीक्षायादी १०० पेक्षा जास्त, तर शयनयान डब्याची प्रतीक्षायादी (वेटींगवर) २०० पेक्षा जास्त आहे. तसेच सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसची द्वितीय श्रेणी डब्याची प्रतीक्षायादी ३०० पेक्षा जास्त आहे. सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी १०० च्या पुढे आहे.

असे आहेत भाडे दर :

 सण-उत्सव किंवा सलग सुटी आल्यास खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकीट दरात भरमसाट वाढ केली जाते. मुंबई-गोवा प्रवासासाठी इतर वेळी ८०० ते १००० रुपये तिकीट असते. मात्र, नाताळ आणि सलग आलेल्या सुट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर गावी जाण्यास निघाले आहेत. त्यामुळे खासगी बसचे दर २ हजारांपासून ते ४ हजारांपर्यंत वाढले आहेत. 

 मुंबई-गुहागर ९०० ते १,२५० रुपये, मुंबई चिपळूण ९०० ते २,५०० रुपये, मुंबई ते सावंतवाडी २,५०० ते ३,५०० रुपये असे खासगी ट्रॅव्हल्सने दर वाढवले आहेत.

Web Title: Travels are expensive are increased crowd of people going for tourism bus railway reservation is full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.