Join us

१९ हजार ९९० सक्रिय रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 1:23 AM

मुंबईतील स्थिती : ८४ हजार ४११ रुग्ण कोविडमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत मंगळवारी ७०० रुग्णांची नोंद झाली, तर ५५ मृत्यू झाले आहेत. परिणामी शहर- उपनगरातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १० हजार ८८२ झाली असून, मृतांचा आकडा ६ हजार १८७ झाला आहे. अन्य कारणांमुळे २९४ मृत्यू झाले आहेत. तर आतापर्यंत ८४ हजार ४११ रुग्ण कोविडमुक्तझाले आहेत. सध्या १९ हजार ९९० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरूआहेत.मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७६ टक्के असून रुग्ण दुपटीचा दर ६९ दिवस आहे. २१ ते २७ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर १.०२ टक्के आहे. शहर-उपनगरात सोमवारपर्यंत ४ लाख ९४ हजार ३३९ कोविडच्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत दिवसभरात नोंद झालेल्या ५५ मृत्यूंमध्ये ४२ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ३८ रुग्ण पुरुष व १७ रुग्ण महिला आहेत.मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी दोन जणांचे वय ४० वर्षांखाली होते. ३५ जणांचे वय ६० वर्षांहून अधिक होते. तर उर्वरित १८ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील आहेत. शहर-उपनगरात झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात ६२७ सक्रिय कंटेन्मेंट झोन आहेत. तर ६ हजार २२ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.एनएससीआय कोविड केंद्रात २५ अतिदक्षता खाटामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी वरळी येथील एनएससीआय कोविड केंद्रात नव्याने २५ अतिदक्षता खाटा उपलब्ध केल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांना वाढदिवसाची भेट म्हणून या नव्या खाटा सुरू करण्यात आल्याची माहिती एनएससीआय कोविड केंद्राचेडॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी दिली आहे. या खाटा अद्ययावत असून यांचे नियंत्रण यांत्रिक पद्धतीने केले जाणार आहे. यापूर्वी, या केंद्रात १०० अतिदक्षता खाटा कार्यान्वित केल्या असून धारावी, वरळी परिसरातील कोरोना नियंत्रण करण्यात यांचे मोलाचे योगदान आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस