पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन उभी राहतायेत उपचार केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 01:11 AM2020-06-08T01:11:22+5:302020-06-08T01:11:36+5:30

गैरसोय टाळण्यासाठी निर्णय : रुग्ण दुपटीचा निर्णय १३ दिवसांवरून १६ दिवसांवर

Treatment centers are set up keeping in view the rainfall | पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन उभी राहतायेत उपचार केंद्र

पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन उभी राहतायेत उपचार केंद्र

Next

मुंबई : कोरोनाच्या रुग्णांवर मुंबई महापालिकेची ४ प्रमुख सर्वोपचार रुग्णालये, १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे या परिसरात अधिक क्षमतेची वैशिष्ट्यपूर्ण उपचार केंद्रही उभारण्यात आली आहेत. ही सर्व उपचार केंद्र उभारताना मुंबईतील सरासरी पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन उभारण्यात आली आहेत. जेणेकरून मुंबईच्या पावसाळ्यात या उपचार केंद्रांमध्ये असणाऱ्या रुग्णांची गैरसोय होणार नाही. पावसाळ्यात या उपचार केंद्रात दिल्या जाणाºया वैद्यकीय सेवासुविधांवर प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची अधिकाधिक काळजी घेतली जात आहे.

मुंबई महापालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी १३ वरून आता १६ दिवस इतका झाला असून, मुंबईतील एकूण २४ पैकी १२ प्रशासकीय विभागांची कामगिरी या सरासरीपेक्षाही अधिक सरस आहे. हे सर्व अलगीकरण कार्यवाहीवर जोर दिल्यामुळे साध्य झाले आहे. मुंबईतील आतापर्यंतच्या मृतांच्या विश्लेषणानुसार मधुमेह आणि अतिताण हे एकत्र आजार असल्याने ३२ टक्के, मधुमेहामुळे २७ टक्के आणि अतिताण असल्यामुळे २२ टक्के असे कोरोनासोबत इतर आजारांचे प्रमाण दिसून येते. मुंबईत आतापर्यंत सुमारे २ लाख १२ हजार चाचण्या झाल्या असून हे प्रमाण प्रति दशलक्ष १६ हजार ३०४ इतके आहे. मुंबईमध्ये विविध २२ वैद्यकीय प्रयोगशाळांमधून कोरोना चाचण्या केल्या जात असून, यामध्ये महानगरपालिकेच्या ३, शासनाच्या ५ आणि खासगी १४ अशा प्रयोगशाळांचा समावेश आहे. या सर्व प्रयोगशाळांची मिळून दैनंदिन चाचणी क्षमता सुमारे १० हजार आहे.

च्३ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली.
च्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दररोज सरासरी ४ हजार चाचण्या केल्या जातात.
च्११ मार्च २०२० रोजी पहिला कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळला.
च्३ फेब्रुवारी ते ६ मे २०२० या कालावधीमध्ये मुंबईत १ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला.
च्१ जून २०२० रोजी २ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला.
च्६ मे ते १ जून या अवघ्या २५ दिवसांमध्ये दररोज सरासरी ४ हजार या दराने १ लाख चाचण्या पूर्ण करण्यात आल्या.

च्पूर्वी कोरोनाबाधित रुग्णाच्या २ चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी सोडले जात होते.
च्आता फक्त १ चाचणी निगेटिव्ह आली तरी घरी सोडण्याची मुभा आहे.
च्क्ष-किरण तपासणीमध्ये सुधारणा, आॅक्सिजन पातळीमध्ये सुधारणा असे बदल दिसले तर वैद्यकीय परीक्षण आधारेही चाचणी न करता रुग्णास घरी पाठवून विलगीकरण करता येते.
च्प्रसूतीसाठी येणाºया गर्भवती महिलांची पूर्वी सक्तीने चाचणी करण्यात येत होती. आता तशी आवश्यकता नाही.

Web Title: Treatment centers are set up keeping in view the rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.