Join us

कोरोना रुग्णांवर पंचतारांकित हॉटेलमध्ये उपचार; सौम्य, लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी खाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 7:35 PM

मुंबईत सध्या ८७ हजार ४४३ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ७० हजार रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही मुंबईतील खाजगी रुग्णालयांमध्ये काही रुग्ण जागा अडवून ठेवत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका टप्प्याटप्प्याने खाटांची संख्या वाढवत आहे. मात्र खाजगी रुग्णालयांमध्ये काही रुग्ण गरज नसतानाही खाटा अडवून ठेवत आहेत. यामुळे सौम्य संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील मोठी रुग्णालये अशा पंचतारांकित हॉटेल्सचा वापर करणार आहेत. महापालिकेने गुरुवारपासून दोन हॉटेल्समध्ये अशी सुविधा सुरू केली आहे. 

 

मुंबईत सध्या ८७ हजार ४४३ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ७० हजार रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही मुंबईतील खाजगी रुग्णालयांमध्ये काही रुग्ण जागा अडवून ठेवत आहेत. त्यामुळे ज्यांची प्रकृती गंभीर नाही त्यांना खासगी रुग्णालयातून हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहे. मात्र ही प्रक्रिया करण्याआधी उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संमती आवश्यक असणार आहे. ही सेवा देण्यासाठी महापालिकेला खाजगी रुग्णालयांचे सहकार्य मिळणार आहे. मात्र खाजगी रुग्णाला या मार्फत सुचविण्यात आलेल्या रुग्णाला अशा हॉटेलमध्ये दाखल केले जाणार आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले रुग्णही खाजगी रुग्णालयाच्या सूचनेनंतर येथे दाखल होऊ शकणार आहेत.

 

या हॉटेलमध्ये होणार उपचार...

असे हॉटेल्स खासगी रुग्णालयांचा विस्तारित भाग म्हणून कार्यरत असणार आहेत. हॉटेलमध्ये कोरोना रुग्णांसाठी २० खोल्यांची गरज असून २४ तास डॉक्टर, नर्स, औषधं आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असावी. या सुविधेसाठी रुग्णालय चार हजारांपर्यंतचं शुल्क आकारु शकतात. जर रुग्णासोबत आणखी कोणी राहत असल्यास हे शुल्क सहा हजारांपर्यंत वाढविता येईल. औषध उपचार डॉक्टरांकडून तपासणीचे अतिरिक्त शुल्क रुग्णालयाकडून आकारण्यात येतील.

 

सध्या या दोन रुग्णालयात खाटा...

रूग्णालय...समन्वयक...क्रमांक...हॉटेल....रूम...डबल रूम..खाटा

बॉम्बे हॉस्पिट.. डॉ.गौतम भन्साळी..९८१९०२४४४५.. इंटर्काँटीनेंतल, मरिन ड्राईव्ह...१३...०२...२२

 

एच. एन. रिलायन्स ...डॉ. तरंग.. ९००४७१३६०३.... ट्रायडंट बीकेसी...२०....०...२०

 

 

* मुंबईमध्ये समर्पित कोरोना काळजी केंद्रे, जम्बो केंद्रे, कोरोना काळजी केंद्रे-२ येथे - ४५ हजार २१० खाटा उपलब्ध आहेत. यापैकी एकूण ३६ हजार ४३२ खाटांवर रुग्ण असून उर्वरित एकूण ८,७७८ खाटा रिक्त आहेत.

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस