ग्रामीण भागांतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:11 AM2021-09-04T04:11:04+5:302021-09-04T04:11:04+5:30

मुंबई : मालेगावमधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत १९ मुलांवर मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील पेडिएट्रिक कार्डियक स्पेशालिस्ट्स हृदय शस्त्रक्रिया करणार आहेत. ...

Treatment of economically weaker children in rural areas | ग्रामीण भागांतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांवर उपचार

ग्रामीण भागांतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांवर उपचार

Next

मुंबई : मालेगावमधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत १९ मुलांवर मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील पेडिएट्रिक कार्डियक स्पेशालिस्ट्स हृदय शस्त्रक्रिया करणार आहेत. यातील सर्वात लहान मूल ३ वर्षांचे असून तर सर्वात मोठे मूल १५ वर्षांचे आहे. या मुलांमध्ये हृदयामध्ये छिद्र आणि ब्ल्यू बेबी सिंड्रोम हृदयविषयक विकार आढळले.

पेडिएट्रिक कार्डियोलॉजीच्या सल्लागार डॉ. स्वाती गरेकर आणि पेडिएट्रिक कार्डियो-व्हॅस्कुलर सर्जरीचे सल्लागार डॉ. भरत सोनी यांच्या नेतृत्वांतर्गत नाशिकच्या स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहयोगाने महिला व बाल रुग्णालय येथे स्क्रीनिंग ओपीडीचे आयोजन करण्यात आले होते.

फोर्टिस हॉस्पिटलमधील पेडिएट्रिक कार्डियोथोरासिस सर्जरीचे सल्लागार डॉ. धनंजय मालणकर म्हणाले की, आरोग्यसेवेचा खर्च या समस्येमुळे बहुतांश पालक त्यांच्या मुलांचे भाग्य ठरवणे नियतीवर सोडतात. नाशिक आरोग्य प्राधिकरणांसोबतचा आमचा उपक्रम या कुटुंबांना साह्य करण्यासाठी आणि या मुलांना सुधारित जीवनाचा दर्जा देण्यासाठी आमच्याकरिता विश्वसनीय संधी देणारा ठरला. काही मुले खूपच आजारी आहेत आणि ओपन हार्ट सर्जरी त्यांच्यासाठी जीवनदायी ठरेल.

फोर्टिस हॉस्पिटलमधील पेडिएट्रिक कार्डियोलॉजीच्या सल्लागार डॉ. स्वाती गरेकर म्हणाल्या की, या बॅचमधील सहा मुलांवर साधे छिद्र किंवा अतिरिक्त रक्तवाहिन्या बंद करण्यासाठी कॅथलॅबमध्ये शस्त्रक्रिया करण्यात करण्यात येईल. ही मुले अल्प-उत्पन्न असलेल्या कुटुंबांमधील असल्यामुळे त्यांच्या पालकांसाठी उपचार खर्च करणे खूपच कठीण आहे. तसेच महामारीमुळे या कुटुंबांवर अधिक ताण निर्माण झाला आणि निदान व उपचारामध्ये विलंब झाल्यामुळे त्यांच्या मुलांचे आरोग्य अधिक खालावले. हा उपक्रम या मुलांसाठी खूपच लाभदायी ठरेल.

फोर्टिस हॉस्पिटल्सच्या विभागीय संचालिका डॉ. एस. नारायणी म्हणाल्या की, आम्हाला हा ओपीडी उपक्रम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) आणि नाशिकच्या आरोग्य प्राधिकरणांसोबत केला जात आहे. हा उपक्रम ग्रामीण महाराष्ट्राच्या विविध भागांमधील मुलांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. आमचा अधिकाधिक जीवन वाचवण्याचा व समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे. मला माझ्या पेडिएट्रिक कार्डियक टीमचा अभिमानदेखील आहे.

Web Title: Treatment of economically weaker children in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.