उपचार ८० टक्के यशस्वी, तरीही वाढतोय क्षयरोग! मुंबईची २०२३ मधील ५०,२०६ रुग्णसंख्या वर्षभरात पोहोचली ५३,६३८ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:33 IST2025-04-01T13:29:03+5:302025-04-01T13:33:13+5:30

Mumbai Health News: मुंबईमध्ये क्षयरोगाच्या ८० टक्के रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे मात्र, मुंबईतील २०२३ मधील ५०,२०६ या रुग्णसंख्येत वाढ होऊन २०२४ मध्ये ती ५३,६३८ इतकी क्षयरोग रुग्ण संख्या वाढल्याचे समोर आले आहे.

Treatment is 80 percent successful, but tuberculosis is still increasing! | उपचार ८० टक्के यशस्वी, तरीही वाढतोय क्षयरोग! मुंबईची २०२३ मधील ५०,२०६ रुग्णसंख्या वर्षभरात पोहोचली ५३,६३८ वर

उपचार ८० टक्के यशस्वी, तरीही वाढतोय क्षयरोग! मुंबईची २०२३ मधील ५०,२०६ रुग्णसंख्या वर्षभरात पोहोचली ५३,६३८ वर

 मुंबई - मुंबईमध्ये क्षयरोगाच्या ८० टक्के रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे मात्र, मुंबईतील २०२३ मधील ५०,२०६ या रुग्णसंख्येत वाढ होऊन २०२४ मध्ये ती ५३,६३८ इतकी क्षयरोग रुग्ण संख्या वाढल्याचे समोर आले आहे. रुग्णांना उत्तम उपचार मिळण्यासाठी  निदान प्रक्रिया, सेवांमध्ये सुधारणा केली आहे. नवीन औषध उपचार पद्धती, क्षयरोग नियंत्रणासाठी विशेष उपक्रम, रुग्णांना मार्गदर्शन यामुळे यशस्वी उपचाराचे प्रमाण वाढले, असे  पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘टीबीमुक्त मुंबई’  ध्येय साध्य करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा विभाग पातळीवर कार्यरत आहे. २०२४ मध्ये मुंबईतील ६०,६३३ क्षयरुग्णांपैकी ३८ टक्के हे फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोगाचे रुग्ण, ६ टक्के बालरुग्ण, तर ९ टक्के हे औषधांना प्रतिसाद न देणारे रुग्ण होते. डिसेंबर २०२४ पासून आयसीएमआरच्या सहकार्याने प्रौढ नागरिकांसाठी बीसीजी लसीकरण उपक्रम हाती घेण्यात आला. ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ या काळात ११,३४९ क्षयरुग्णांची नोंद झाली आहे, तर १६,७३५ जणांचे लसीकरण केले  असे पालिका अधिकारी म्हणाले. 

क्षयरोगाची प्रमुख लक्षणे
दोन आठवड्यांहून अधिक कालावधीचा खोकला,
ताप, वजन कमी होणे, रात्री घाम येणे, भूक मंदावणे
छातीत दुखणे, दम लागणे, खोकताना रक्त येणे, मानेवर गाठ येणे   

क्षयरोग नियंत्रणासाठी विशेष उपक्रम
१०० दिवस मोहीम
निदान सुविधांचे अद्ययावतीकरण
औषध-प्रतिरोधक क्षयरुग्णांसाठी विशेष उपचारपद्धती
क्षयरोग निदानासाठी डब्लूजीएस तंत्राचा वापर
हँडहेल्ड एक्स-रे मशीन
मार्च २०२५ पर्यंत १६,७३५ जणांना बीसीजी लसीकरण
गेल्या दोन वर्षांत १,१८,६३३ जणांना पोषण आहार वाटप 

४ वर्षांत मुंबईत तपासणी करून निदान झालेले २,४८,१६९ क्षयरुग्ण आढळले आहेत. यात २,०८,६९६ रुग्ण मुंबईतील तर ३९,४७० रुग्ण मुंबई बाहेरील होते.

Web Title: Treatment is 80 percent successful, but tuberculosis is still increasing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.