बालवयात कर्करोगाचे उपचार दु:खद- राज्यपाल बैस; ५० कर्करोग्रगस्त मुलांनी दिली राजभवनला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 05:48 AM2023-03-19T05:48:43+5:302023-03-19T05:49:03+5:30

टाटा स्मृती रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या ५० कर्करोगग्रस्त लहान मुलांना त्यांच्या पालकांसह राजभवन भेटीचे आयोजन टाटा मेमोरिअल सेंटर-इम्पॅक्ट फाउंडेशन व क्रिश फाउंडेशन या संस्थांनी केले होते. 

Treatment of childhood cancer is tragic - Governor Bais; 50 children with cancer visited Raj Bhavan | बालवयात कर्करोगाचे उपचार दु:खद- राज्यपाल बैस; ५० कर्करोग्रगस्त मुलांनी दिली राजभवनला भेट

बालवयात कर्करोगाचे उपचार दु:खद- राज्यपाल बैस; ५० कर्करोग्रगस्त मुलांनी दिली राजभवनला भेट

googlenewsNext

मुंबई : जे वय खेळण्या-बागडण्याचे, अभ्यासाचे आहे, अशा वयात लहान मुलांना कर्करोगासाठी उपचार घेताना पाहणे क्लेशदायक आहे. उपचारादरम्यान लहान मुलांची व त्यांच्या  पालकांची मन:स्थिती काय होत असेल, याचा अंदाजदेखील बांधता येत नाही. मुलांना त्यांचे लहानपण मिळत नाही, हे दु:खदायक आहे, अशा भावना राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी व्यक्त केल्या.
टाटा स्मृती रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या ५० कर्करोगग्रस्त लहान मुलांना त्यांच्या पालकांसह राजभवन भेटीचे आयोजन टाटा मेमोरिअल सेंटर-इम्पॅक्ट फाउंडेशन व क्रिश फाउंडेशन या संस्थांनी केले होते. 
यावेळी या मुलांसोबत राज्यपाल रमेश बैस यांनी वेळ घालवला व त्यांचे स्वागत केले. योग्य व वेळेवर उपचार केल्यास लहान मुले कर्करोगावर पूर्णपणे मात करू शकतात व चांगले जीवन जगू शकतात, असे राज्यपाल यावेळी म्हणाले.

मुलांना भेटवस्तूंचे वाटप
  राज्यपालांनी मुलांना भेटवस्तूंचे वाटप करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
  राज्यपालांनी टाटा मेमोरिअल सेंटरच्या इम्पॅक्ट फाउंडेशन व क्रिश फाउंडेशनला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. 
  यावेळी इम्पॅक्ट फाउंडेशनच्या मुख्य अधिकारी शालिनी जटिया, क्रिश फाउंडेशनचे संस्थापक नवीन शेट्टी, वंदना शेट्टी, लहान मुलांचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. व्यंकट राम मोहन 
व लहर बच्छावत, आदी उपस्थित 
होते.

Web Title: Treatment of childhood cancer is tragic - Governor Bais; 50 children with cancer visited Raj Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.