Join us

बालवयात कर्करोगाचे उपचार दु:खद- राज्यपाल बैस; ५० कर्करोग्रगस्त मुलांनी दिली राजभवनला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 5:48 AM

टाटा स्मृती रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या ५० कर्करोगग्रस्त लहान मुलांना त्यांच्या पालकांसह राजभवन भेटीचे आयोजन टाटा मेमोरिअल सेंटर-इम्पॅक्ट फाउंडेशन व क्रिश फाउंडेशन या संस्थांनी केले होते. 

मुंबई : जे वय खेळण्या-बागडण्याचे, अभ्यासाचे आहे, अशा वयात लहान मुलांना कर्करोगासाठी उपचार घेताना पाहणे क्लेशदायक आहे. उपचारादरम्यान लहान मुलांची व त्यांच्या  पालकांची मन:स्थिती काय होत असेल, याचा अंदाजदेखील बांधता येत नाही. मुलांना त्यांचे लहानपण मिळत नाही, हे दु:खदायक आहे, अशा भावना राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी व्यक्त केल्या.टाटा स्मृती रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या ५० कर्करोगग्रस्त लहान मुलांना त्यांच्या पालकांसह राजभवन भेटीचे आयोजन टाटा मेमोरिअल सेंटर-इम्पॅक्ट फाउंडेशन व क्रिश फाउंडेशन या संस्थांनी केले होते. यावेळी या मुलांसोबत राज्यपाल रमेश बैस यांनी वेळ घालवला व त्यांचे स्वागत केले. योग्य व वेळेवर उपचार केल्यास लहान मुले कर्करोगावर पूर्णपणे मात करू शकतात व चांगले जीवन जगू शकतात, असे राज्यपाल यावेळी म्हणाले.

मुलांना भेटवस्तूंचे वाटप  राज्यपालांनी मुलांना भेटवस्तूंचे वाटप करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.   राज्यपालांनी टाटा मेमोरिअल सेंटरच्या इम्पॅक्ट फाउंडेशन व क्रिश फाउंडेशनला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.   यावेळी इम्पॅक्ट फाउंडेशनच्या मुख्य अधिकारी शालिनी जटिया, क्रिश फाउंडेशनचे संस्थापक नवीन शेट्टी, वंदना शेट्टी, लहान मुलांचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. व्यंकट राम मोहन व लहर बच्छावत, आदी उपस्थित होते.

टॅग्स :रमेश बैस