स्वाइन फ्लूच्या रुग्णाला पालिकेने नाकारले उपचार
By admin | Published: March 27, 2015 01:28 AM2015-03-27T01:28:12+5:302015-03-27T01:28:12+5:30
स्वाइन फ्लूच्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवल्याचा दावा करणाऱ्या पालिकेच्या दिव्याखालीच अंधार असल्याचे घटना नुकतीच उघड झाली़
मुंबई : स्वाइन फ्लूच्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवल्याचा दावा करणाऱ्या पालिकेच्या दिव्याखालीच अंधार असल्याचे घटना नुकतीच उघड झाली़ स्वाइन फ्लूची लागण झाल्यामुळे उपचारासाठी पालिका रुग्णालयात धाव घेणाऱ्या एका महिला रुग्णाला रात्रभर एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात खेपा घालण्याची वेळ पालिकेने आणली़ अखेर या महिलेने कंटाळून मध्यरात्री खाजगी रुग्णालय गाठले़ या गंभीर घटनेच्या चौकशीचे आदेश प्रशासनाने आज दिले़
गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर क्ऱ १ मध्ये राहणाऱ्या एका महिलेला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निदान खाजगी रुग्णालयाने केले़ त्यामुळे क्षणाचाही वेळ न दवडता या महिलेने सातरस्ता येथील कस्तूरबा रुग्णालय गाठले़ मात्र साथीच्या आजारांसाठी विशेष सोय असतानाही रुग्णालयात या महिलेस दाखल करुन घेण्यास नकार दिला़ रात्री दहाच्या सुमारास या महिलेला मुंबई सेंट्रलच्या नायर रुग्णालयात पाठविण्यात आले़ परंतु तेथेही या महिलेची वणवण संपली नाही़ नायर रुग्णालयाने परत कस्तुरबा रुग्णालयाकडेच बोट दाखवित या महिलेची बोळवण केली़
अखेर ही पायपीटमुळे व आजाराने त्रस्त या महिलेच्या नातेवाईकांनी तिला अंधेरीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले़ तेथे तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले़ हा धक्कादायक प्रकार शिवसेनेच्या नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीत आज निदर्शनास आणला़ त्यामुळे या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन वैद्यकीय संचालक (प्रमुख रुग्णालये) डॉ़ सुहासिनी नागडा
यांनी चौकशीचे आदेश दिले
आहेत़ (प्रतिनिधी)
च्मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी होते आहे. पण, गुरूवार, २६ मार्चला मुंबईत दोघाजणांचा स्वाइनमुळे मृत्यू झाला आहे. अंधेरीच्या सात वर्षीय मुलाचा आणि अलिबागच्या ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
च्आत्तापर्यंत १२ मुंबईकरांचा स्वाइनमुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबई बाहेरून आलेल्या २५ रुग्णांचा स्वाइनमुळे मृत्यू झाला.