स्टेमसेल थेरपीद्वारे स्वमग्न मुलांवर उपचार शक्य
By admin | Published: November 13, 2014 12:58 AM2014-11-13T00:58:34+5:302014-11-13T00:58:34+5:30
स्वमग्न (ऑटिझमग्रस्त) मुले अन्य मुलांमध्ये फार मिसळत नाहीत. एखादी व्यक्ती बोलत असली तरी त्याच्याकडे ही मुले लक्ष देत नाहीत.
Next
मुंबई : स्वमग्न (ऑटिझमग्रस्त) मुले अन्य मुलांमध्ये फार मिसळत नाहीत. एखादी व्यक्ती बोलत असली तरी त्याच्याकडे ही मुले लक्ष देत नाहीत. स्वत:ला काही हवे असल्यास मागण्याचा प्रयत्न करतात, मात्र अन्य वेळी ही मुले सर्वापासून अलिप्तच राहणो पसंत करतात. त्यामुळे या मुलांची समज कमी आहे किंवा त्यांची बौद्धिक क्षमता कमी आहे, असे म्हणून त्यांना हिणवले जाते.
प्रत्यक्षात मात्र त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता कमी असते. अशा मुलांवर स्टेमसेल (मूळ पेशी) थेरपीचा उपचार केल्यास त्यांच्या वर्तनात व बोलण्यात लक्षणीय बदल दिसून येत असल्याचे निरीक्षण डॉ. नंदिनी गोकुलचंद्रन यांनी नोंदवले आहे. बालदिनानिमित्त जनजागृती अभियानांतर्गत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भारतामध्ये 25क् सर्वसामान्य मुलांपैकी एक जण स्वमग्न अर्थात ऑटिस्टिक असल्याचे आढळते. स्वमग्नता म्हणजे गतिमंद असाच समज आता समाजात रूढ होऊ पाहतो आहे. पण ही बाब अत्यंत चुकीची आहे. स्वमग्न मुलांची बौद्धिक क्षमता अन्य सामान्य मुलांप्रमाणोच असते, मात्र ही मुले त्यांचे विचार, भावना व्यक्त करू शकत नाहीत. या मुलांसाठी व्यवसायोपचारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वाचा उपचारतज्ज्ञ आणि विशेष शिक्षक यांच्या माध्यमातून उपचार केले जातात. मात्र तरीही स्वमग्न मुलांमध्ये म्हणावी तितकी प्रगती होताना दिसत नाही. मात्र स्टेमसेल थेरपीचा उपचार केल्यावर या मुलांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. स्टेमसेल थेरपी केलेल्या 1क्क् स्वमग्न मुलांवर केलेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले, की 35 टक्के मुले बोलू लागली आहेत. तर 48 टक्के मुले ही सांगितलेल्या गोष्टी योग्य पद्धतीने करतात. 5क् टक्के मुले तर नजरेला नजर भिडवून बोलू लागली आहेत. समजण्याची क्षमता आणि शिकण्याची क्षमता 4क् टक्के मुलांमध्ये वाढल्याचे दिसून आल्याचेही डॉ. नंदिनी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
या मुलांना ‘वेगळे’ समजू नका..
लहानपणी देवेंद्र (नाव बदलले आह़े) इतर मुलांप्रमाणो बोलत नसे. स्वत:हून त्याला काही करता येत नव्हते. तीन वर्षापूर्वी देवेंद्रवर स्टेमसेल थेरपी केली. यानंतर दैनंदिन कामे तो स्वत: करतो. त्याला सायकल चालवता येते. ही मुले खूप काही गोष्टी करू शकतात. यामुळे या मुलांना वेगळे समजू नये, असे देवेंद्रच्या आईने सांगितले.