मुंबईत १३,१५४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:19 AM2020-12-04T04:19:46+5:302020-12-04T04:19:46+5:30

मुंबई : मुंबईत दिवसभरात काेराेनाच्या नव्या ८७८ रुग्णांचे निदान झाले असून १८ जणांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांचा आकडा २ ...

Treatment started on 13,154 active patients in Mumbai | मुंबईत १३,१५४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू

मुंबईत १३,१५४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू

googlenewsNext

मुंबई : मुंबईत दिवसभरात काेराेनाच्या नव्या ८७८ रुग्णांचे निदान झाले असून १८ जणांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांचा आकडा २ लाख ८३ हजार ६८९ वर पोहोचला असून मृतांचा आकडा १०,८५७ एवढा आहे.

गुरुवारी दिवसभरात ७,६४३ रुग्ण बरे झाले. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २ लाख ५८ हजार ११२ वर गेली आहे. सध्या १३,१५४ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर पोहोचले असून रुग्ण दुपटीचा कालावधी २३२ दिवसांवर गेला आहेे.

Web Title: Treatment started on 13,154 active patients in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.