राज्यात ५४ हजार ३१७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:07 AM2021-01-04T04:07:08+5:302021-01-04T04:07:08+5:30
मुंबई : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४. ५९ टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्युदर २.५६ टक्के झाला आहे. सध्या राज्यात ...
मुंबई : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४. ५९ टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्युदर २.५६ टक्के झाला आहे. सध्या राज्यात ५४ हजार ३१७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रविवारी २ हजार ६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत १८ लाख ३६ हजार ९९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात दिवसभरात ३ हजार २८२ रुग्ण आणि ३५ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख ४२ हजार १३६ झाली असून, बळींचा आकडा ४९ हजार ६६६ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ३५ मृत्युंपैकी २० मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ३५ मृत्युंमध्ये मुंबई ३, नवी मुंबई ३, वसई-विरार मनपा १, नाशिक मनपा २, अहमदनगर १, पुणे मनपा ३, सोलापूर २, सातारा १, परभणी मनपा १, नांदेड १, नांदेड मनपा १, यवतमाळ ४, नागपूर ४, नागपूर मनपा ६, गोंदिया १, चंद्रपूर मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे. सध्या राज्यात २ लाख ४७ हजार ९७२ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून, २ हजार ९६९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २९ लाख ५८ हजार ५०२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.९९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
............................