मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी आता या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना डॉक्टर, परिचारिकांमध्ये या आजाराच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरील ताण वाढतो आहे. मात्र वरळी येथील पोदार रुग्णालय आणि एनएससीआयमध्ये उभारलेल्या अलगीकरण केंद्रात चक्क रुग्णांच्या संपर्कात न येता उपचार करण्याचा प्रयोग यशस्वी ठरत आहे. तसेच येथील रुग्णसंख्येतही घट होत असल्याने ‘वरळी पॅटर्न’ने मुंबईकरांना आशेचा किरण दाखवला आहे.मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मात्र काहीच दिवसात वरळी कोळीवाड्यात रुग्णांची संख्या वाढत गेली आणि हा विभाग मुंबईतच नव्हे तर राज्यात ‘हॉटस्पॉट’ ठरला. वरळी परिसरात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान पालिकेसमोर उभे राहिले. त्यानुसार रुग्ण सापडलेल्या परिसरात प्रवेश बंद, संसर्गाची साखळी शोधणे, त्यांचे विलगीकरण करणे, त्यांच्या घरी किराणा माल पोहोचविणे अशा उपाययोजना महापालिकेच्या जी दक्षिण विभागाने सुरू केल्या. परंतु, येथील दाटीवाटीने वसलेल्या घरांमध्ये संशयित रुग्णांचे विलगीकरण करणे धोकादायक ठरू लागले.संसर्गाचा धोका टाळण्यासाठी संशयित रुग्णांकरिता पोदार रुग्णालयात विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला. ‘इन्स्टिट्युुशनल क्वारंटाइन’चा पहिला प्रयोग वरळीमध्ये झाला. पोदार रुग्णालयाबरोबरच नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियाच्या (एनएससीआय) भव्य स्टेडियमवर पाचशे ५०० खाटांचे ‘कोविड केअर सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. जी दक्षिण विभागाने मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर मुफ्फजल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष तयार केला आहे. येथे रुग्णांच्या संपर्कात न येता डॉक्टरांमार्फत होणाºया प्रभावी उपचारपद्धतीचे कौतुक केंद्रातून आलेल्या विशेष पथकानेही केल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.एनएससीआय विलगीकरण कक्षाचे वैशिष्ट्यया केंद्रात ५०० खाटांची सोय करण्यात आली आहे. डॉक्टर, परिचारिका असे ५० जणांचे पथक रुग्णांवर लक्ष ठेवून असते. डॉक्टरांसाठी काही पारदर्शक खोल्या या ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत. त्यात उभे राहून डॉक्टर रुग्णांची रोज तपासणी करतात.दररोज रुग्णांचा रक्तदाब, ताप, नाडीचे ठोके आणि चाचणीसाठी घशाचा स्राव घेणे हे सर्व काही रुग्णाला हात न लावता केले जाते. यामुळे डॉक्टरांना संसर्ग होण्याचा धोका टळत असून रुग्णांवरही तणाव येत नाही, अशी माहिती डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी दिली. वरळी परिसरात आतापर्यंत एक लाख लोकांची तपासणी करण्यात आली. त्यातून लक्षणे असलेल्या ४०० लोकांना वेगळे करण्यात आले.>वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील ताण कमी : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आज आपल्याकडे जास्तीत जास्त डॉक्टर, परिचारिकांची गरज आहे. एनएससीआयमधील विलगीकरण कक्षामुळे डॉक्टर आज निश्च्ािंत होऊन रुग्णांवर उपचार करीत आहेत, असे मत डॉ. लकडावाला यांनी व्यक्त केले.कक्षातील सुविधा : सध्या या ठिकाणी २६५ रुग्ण आहेत. १४ दिवस येथे राहणाºया रुग्णांच्या मनोरंजनासाठी मोठ्या स्क्रीनवर मनोरंजनाचे कार्यक्रम, आरोग्याबाबत जनजागृती करणारे माहितीपट दाखवले जात आहेत.
रुग्णाच्या संपर्कात न येता होतो उपचार, वरळी पॅटर्नने दाखवले आशेचे किरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 1:48 AM