वृक्ष प्राधिकरण कागदावरच

By admin | Published: March 1, 2015 12:34 AM2015-03-01T00:34:41+5:302015-03-01T00:34:41+5:30

पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन केली असली तरी प्रत्यक्षात कृती न करता केवळ अर्थसंकल्पाची औपचारिकता पूर्ण केली जात असल्याचे शहरातील पर्यावरणाच्या ऱ्हासातून स्पष्ट झाले आहे.

Tree Authority on paper | वृक्ष प्राधिकरण कागदावरच

वृक्ष प्राधिकरण कागदावरच

Next

नामदेव मोरे ल्ल नवी मुंबई
पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन केली असली तरी प्रत्यक्षात कृती न करता केवळ अर्थसंकल्पाची औपचारिकता पूर्ण केली जात असल्याचे शहरातील पर्यावरणाच्या ऱ्हासातून स्पष्ट झाले आहे. पालिकेच्या या कारभारावर पर्यावरणप्रेमींनी चीड व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संवर्धन अधिनियम १९७५ चे कलम १६ अन्वये प्रत्येक महापालिकेने वृक्ष प्राधिकरणाचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक आहे. शहरात फक्त गगनचुंबी इमारती उभ्या राहू नयेत. वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात करण्यात यावी, यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. परंतु नवी मुंबईमध्ये मागील अनेक वर्षांपासून अर्थसंकल्प सादर केला जातो. परंतु अंमलबजावणीकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. गत काही वर्षांपासून प्रत्येक वर्षी १ लाख वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जात असल्याचे पाहावयास मिळत नाही. मुळात कुठे वृक्ष लावणे आवश्यक आहे, कुठे जागा शिल्लक आहे, त्याचे सर्वेक्षणही अद्याप कधीच करण्यात आलेले नाही. इमारत बांधतानाही संबंधितांना वृक्षलागवड करणे आवश्यक असते. परंतु त्याचीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. महापालिकेने २०१४-१५ मध्ये वृक्षलागवडीसाठी ३ कोटी रुपयांची तरतूद केली होती. एप्रिल ते नोव्हेंबर अखेर १ कोटी २ लाख ८१ हजार रुपये खर्च करण्यात आले होते. डिसेंबर ते मार्च या काळात १ कोटी ९५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुळात पावसाळ्यात वृक्षलागवडीसाठी कमी व पावसाळा संपल्यानंतर जास्त खर्च झाल्याचे निदर्शनास आले आहे.
वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांचा अभ्यास दौरा प्रत्येक वर्षी आयोजित केला जातो. या दौऱ्यावरही लाखो रुपये खर्च करण्यात येतात. परंतु दौरा केल्याचा काहीही लाभ अद्याप पालिकेस झालेला नाही. प्रत्येक वर्षी औषधी वनस्पतींची लागवड करणे, वनस्पती उद्यान तयार करण्याची तरतूद केली जाते. परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नाही.
नवी मुंबईला ३४ किलोमीटर लांबीचा खाडीकिनारा लाभला आहे. खाडीकिनारी असलेल्या खारफुटीची अनेक वेळा कत्तल केली जाते. खारफुटीचे रक्षण व्हावे यासाठी खारफुटीच्या वृक्षांची लागवड व संवर्धन करण्यासाठी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जात आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच कार्यवाही केली जात नाही. प्रशासन पर्यावरण रक्षणाविषयी गंभीर नसल्याचेच यावरून लक्षात येत आहे.

शहराचा विकास करताना पर्यावरणाकडे लक्ष दिले जाणार आहे. जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्यात येणार आहे. दुभाजकामध्ये ग्रीनबेल्ट तयार केला जाणार आहे. डोंगररांगांवरही वृृक्षलागवड केली जाईल.अर्थसंकल्प प्रत्यक्षात आणला जाईल.
- दिनेश वाघमारे, आयुक्त, महानगरपालिका

च्महापालिकेतर्फे प्रत्येक वर्षी एक लाख वृक्षलागवडीचा संकल्प केला जातो. परंतु प्रत्यक्षात लागवडीसाठी नियोजन केले जात नाही. वृक्ष कोठे लावता येतील त्याचे सर्वेक्षणही होत नाही. शहरातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक विभागात जास्तीत जास्त वृक्षलागवड करणे आवश्यक आहे. फक्त घोषणा न करता प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

 

Web Title: Tree Authority on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.