मुंबईकरांच्या भेटीला देश-विदेशातील झाड अन् फुले

By स्नेहा मोरे | Published: February 7, 2024 06:36 PM2024-02-07T18:36:02+5:302024-02-07T18:37:19+5:30

प्रेक्षकांना कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही आणि रांगेत उभे राहण्याची गरज नाही. या प्रदर्शनाचे प्रवेशद्वार मोठे व खुले असेल.

Trees and flowers from abroad exhibition in mumbai | मुंबईकरांच्या भेटीला देश-विदेशातील झाड अन् फुले

मुंबईकरांच्या भेटीला देश-विदेशातील झाड अन् फुले

मुंबई - वृक्षमित्र संघटनेच्या ( द नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्स ऑफ ट्री ) वतीने मुंबईकरांसाठी देश विदेशातील भाजीपाला, फळे आणि झाडांचे ६१ वे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १० आणि ११ फेबुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ८ या वेळेत माटुंगा येथील रुपारेल महाविद्यालयात याचे आयोजन केले जाणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने एकाच वेळी अनेक रंग, प्रकार, रुपाची झाडे- फुले पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.

प्रेक्षकांना कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही आणि रांगेत उभे राहण्याची गरज नाही. या प्रदर्शनाचे प्रवेशद्वार मोठे व खुले असेल. या प्रदर्शनाला नेहमीप्रमाणे सुमारे आठ हजारांहून अधिक निसर्गप्रेमी पर्यटक भेट देतील अशी अपेक्षा आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन व बक्षीस वितरणासाठी मान्यवरांची मांदियाळी हर्षा हिंदुजा, कुलगुरू अनिरुद्ध पंडित, सॉलिसिटर राजन जयकर व जितेंद्र परदेशी असणार आहेत. कॅम्पसमध्ये वनस्पती, भाजीपाला, फुलांची रोपे आणि त्यांची रोपटी असणार आहेत, अशी माहिती वृक्षमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरुण सावंत यांनी दिली आहे.

हे असणार आकर्षण

२०० प्रकारचे गुलाब आणि मातीशिवाय भाजीपाला...

या प्रदर्शनात विविध प्रकारची फुले, फळे, कुंडीतील झाडे विशिष्ट रचनेतून मांडण्यात येतील. प्रदर्शनात एकाच वेळी २०० प्रकारचे विदेशी गुलाब हे विशेष पुष्प रचनेतून प्रदर्शित केले जातील. सुगंधी गुलाब व इतर औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात मांडल्या जातील. तसेच गालिचा पद्धतीने झाडे व फुले मांडले जातील. या प्रदर्शनाचे नेहमीचे आकर्षण म्हणजे अनेक जातीचे निवडुंग व जलधारी वनस्पती ठेवल्या जातील. मातीशिवाय कुंडीमध्ये पिकवलेला भाजीपाला हे या प्रदर्शनाचे आकर्षण असेल. तसेच एकाच वेळी सेंद्रिय शेती, गच्चीवरील शेती कशी करावी याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे.

Web Title: Trees and flowers from abroad exhibition in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई