Join us

ढाक बहिरीवरून पडून ट्रेकरचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 12:52 PM

औरंगाबाद येथील प्रतीक आवळे, पंकज गावदाडे, सुजित लहाने अभिशेख शेजुळ, सागर जैस्वाल हे पाचजण ५ फेब्रुवारी रोजी ट्रेकिंगसाठी कर्जतनजीकच्या ढाक बहिरी येथे आले होते.

कर्जत : तालुक्यातील गौरकामत गावानजीकच्या ढाक बहिरी येथील किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या पाचजणांपैकी एकाचा ट्रेकिंग करताना तोल गेला आणि पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. या मृत झालेल्या ट्रेकरचा मृतदेह गिर्यारोहकांनी काढला.औरंगाबाद येथील प्रतीक आवळे, पंकज गावदाडे, सुजित लहाने अभिशेख शेजुळ, सागर जैस्वाल हे पाचजण ५ फेब्रुवारी रोजी ट्रेकिंगसाठी कर्जतनजीकच्या ढाक बहिरी येथे आले होते. दुपारच्या सुमारास त्यातील प्रतीक हा तोल जाऊन खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मागून येत असलेल्या त्याच्या दोन सहकाऱ्यांना  प्रतीकचा मृतदेह दिसला. जुन्नर येथील जितेंद्र हांडे-देशमुख यांच्याकडून महाराष्ट्र रेस्क्यू कोऑर्डीनेशन सेंटरला ही घटना समजताच या हेल्पलाइनमार्फत कर्जत येथून संतोष दगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांडशी गावातील स्थानिकांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यामागोमाग खोपोलीचे यशवंती हायकर्सचे सदस्य घटनास्थळी पोहोचले. त्या ट्रेकरचा मृतदेह ढाक डोंगराच्या अत्यंत अवघड अशा अरुंद बाजूच्या उतारावर पडला होता. त्यातच काळोख आणि घनदाट जंगलामुळे रेस्क्यू करणे अवघड होते. सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेल्या रेस्क्यू ऑपरेशनला तब्बल दहा तास लागले. 

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रऔरंगाबाद