Join us

अंतिम इशारा देत आदिवासी शेतकरी परतीच्या वाटेवर; मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 1:40 AM

आदिवासी शेतकऱ्यांचे प्रलंबित दावे तीन महिन्यांत निकाली काढण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर उलगुलान मोर्चाची गुरुवारी सायंकाळी यशस्वी सांगता झाली.

मुंबई : आदिवासी शेतकऱ्यांचे प्रलंबित दावे तीन महिन्यांत निकाली काढण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर उलगुलान मोर्चाची गुरुवारी सायंकाळी यशस्वी सांगता झाली. मात्र तीन महिन्यांत मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही, तर पुन्हा मुंबईवर धडक देण्याचा इशारा लोकसंघर्ष मोर्चाच्या महासचिव प्रतिभा शिंदे यांनी गुरुवारी मोर्चाची सांगता करताना दिला.ठाण्यातून निघालेल्या उलगुलान मोर्चाने बुधवारी रात्री चुनाभट्टी येथील शिवाजी मैदानात विश्रांती घेतली. मात्र मध्यरात्रीपासूनच पोलिसांनी आंदोलकांना हुसकवण्यास सुरुवात केल्याचा आरोप शिंदे यांनी केला.सकाळी ८ वाजता निघणाºया मोर्चेकºयांना ६ वाजताच मैदान सोडावे लागले. शिवाजी मैदानातून निघालेल्या संतप्त मोर्चेकºयांनी माटुंगा उड्डाणपुलावर सकाळी ठिय्या दिला. त्यानंतर शिस्तीने सर्व आंदोलक आझाद मैदानाच्या दिशेने निघाले. ४० किमी पायपीट करत शिस्तबद्धतेने आदिवासी शेतकºयांचा मोर्चा गुरुवारी सकाळी ११.१५ वाजता आझाद मैदानात धडकला. सरकारच्या तोंडी आश्वासनावर विश्वास नसल्याने लेखी आश्वासन घेऊनच आझाद मैदान सोडण्याचा प्रण आंदोलकांनी केला होता. त्यासाठी चार वेळ पुरेल इतका शिधा घेऊन आदिवासी शेतकरी मुंबईत धडकले होते. त्यानुसार दुपारी दीड वाजता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाची वाट पाहत मोर्चेकरी रात्रीच्या अंधारातही आझाद मैदानात ठाण मांडून होते. अखेर सायंकाळी ७ वाजता लोकसंघर्ष मोर्चाचे शिष्टमंडळ लेखी आश्वासन घेऊनच मैदानात परतले व मोर्चाची विजयी सांगता करण्यात आली.विराट ‘उलगुलान’सरकार दरबारी प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्त्वाखाली आदिवासी शेतकºयांनी बुधवारी ठाण्यावरून काढलेला लाँग मार्च गुरूवारी मुंबईतील आझाद मैदानावर धडकला. जे.जे. उड्डाणपुलावरून जाणाºया या ‘उलगुलान’ मोर्चाचे टिपलेलेविराट रूप...निवडणुकीत धडा शिकवूजर सरकारने मान्य केलेल्या मागण्या तीन महिन्यांत पूर्ण केल्या नाही, तर तर निवडणुका तोंडावरच आहेत. तेव्हा आदिवासी शेतकरी धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रतिभा शिंदे म्हणाल्या.उत्साह कायम : ४० किमीची पायपीट केल्यानंतर मोर्चातील १०० वर्षे वय असलेल्या जिलाबाई वसावे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. आपल्या धारदार शैलीत गाणे सादर करत जिलाबाई यांनी मोर्चाचा उत्साह शिगेला पोहोचवला होता.दुमदुमली मुंबई : ‘आरं कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय जाणार नाय’, ‘लडेंगे - जितेंगे’ अशा विविध घोषणांनी गुरुवारी मुंबई दुमदुमली. ‘एकच नारा, सातबारा’ या मागणीचा उल्लेख करत आदिवासी शेतकºयांनी आपला निर्धारही व्यक्त केला.आदिवासी सरकारला घरी पाठवणार!आंदोलनाला पाठिंबा देताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, आदिवासीआणि शेतकºयांना आठ महिन्यांपूर्वी सरकारने दिलेले आश्वासन पाळले नसल्याने पुन्हा मोर्चा काढावा लागला. ही लाजिरवाणी बाब आहे. एकीकडे राज्यात दुष्काळाचे सावट असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रामनामाचा जप करण्यात गुंतले आहेत.त्यामुळे अशा सरकारला आदिवासी शेतकरी आराम करायला घरी पाठवतील, असेही विखे-पाटील या वेळी म्हणाले.मुख्यमंत्र्यांची तयारीमोर्चाचे नेतृत्व करणाºया प्रतिभा शिंदे आणि पारोमिता गोस्वामी यांनी जोरकसपणे आदिवासी शेतकºयांचे प्रश्न मांडले. शिष्टमंडळाला सामोरे जाण्यापूर्वी स्वत: मुख्यमंत्र्यांनी दीड तास ब्रिफिंग घेतले. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.आमदारांची रीघआदिवासी शेतकºयांच्या आंदोलनाची दखल घेत विविध पक्षांच्या आमदारांनी मोर्चाला भेटी देण्यासाठी गुरुवारी रीघ लावली होती. त्यात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, विद्या चव्हाण यांच्यासह विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, सपाचे आमदार अबू असीम आझमी, शिवसेना आमदार सुनील शिंदे अशा विविध आमदारांचा समावेश होता.पुन्हा एकदा शिस्तीचे दर्शनसर्व उड्डाणपुलांवरून मार्गक्रमण करताना दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाºया मार्गिकेवरून उलगुलान मोर्चाने पदक्रमण केले. माटुंगा येथील ठिय्या आंदोलन वगळता दक्षिण मुंबईकडे जाणाºया वाहतुकीत कोणत्याही प्रकारचा व्यत्यय मोर्चेकºयांनी येऊ दिला नाही. परिणामी, सकाळच्या वेळीही दक्षिण मुंबईतील वाहतूक सुरळीत दिसली.

टॅग्स :मुंबईशेतकरी