Join us

जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीने सुखावले आदिवासी

By admin | Published: June 15, 2014 12:43 AM

माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या धोदानी या दुर्गम आणि आदिवासी गावात जाण्यास दळणवळणाचे काहीच साधन नसल्याने या ठिकाणी फारसे कोणी फिरकत नाही

संजय जाधव , पैठणश्री संत एकनाथ महाराजांची पालखी गुरुवार, दि. १९ जून रोजी पैठण येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे सायंकाळच्या सुमारास प्रस्थान करणार आहे. सुमारे २० दिवसांचा पायी प्रवास करीत ही दिंडी आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. मराठवाड्यातील हजारो वारकरी पैठण येथून या दिंडी सोहळ्यात सहभागी होतात. प्रशासनाने या पालखी सोहळ्यास देहू व आळंदीच्या पालखीप्रमाणे सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वारकऱ्यांतून होत आहे.संत एकनाथ महाराज यांची पालखी दि. १९ रोजी सायंकाळच्या सुमारास येथील गागाभट्ट चौकातील ‘पालखी ओटा’पासून प्रस्थान करणार आहे. पालखीचा पहिला मुक्काम त्याच दिवशी पैठण तालुक्यातील चनकवाडी येथे होणार आहे. दि. २० रोजी पालखी पाटेगाव, दादेगाव, मुंगी असा प्रवास करीत हादगाव येथे मुक्कामी थांबणार आहे. दि. २१ रोजी बोधेगाव, बालमटाकळी, बाडगव्हाणमार्गे लाडजळगाव येथे मुक्कामी. दि. २२ रोजी लाडजळगाव, गोळेगाव, शेकटे मार्गे जात कुंडलपारगाव येथे मुक्कामी. दि. २३ रोजी भगवानगड, माळेगाव, मिडसावंगीमार्गे मुंगूसवाडे येथे मुक्कामी थांबणार आहे. दि. २४ रोजी दहीवंडी, शिरूर कासार, कान्होबावाडी, कोळवाडीमार्गे राक्षसभुवन येथे मुक्कामी राहणार आहे.दि. २५ रोजी विधनवाडी, खोल्याची वाडी, डोळ्याची वाडी, सांगळवाडी, डिसळ्याची वाडीमार्गे रायमोह येथे मुक्कामी. दि. २६ रोजी धनगरवाडी, हाटकरवाडी, मेहेंदरवाडी (गारमाथा), तांबा राजुरी, पाटोदा येथे मुक्काम. दि. २७ रोजी जफरवाडी, पारगाव घुमरे, अनपटवाडीमार्गे दिघोळ मुक्कामी. दि. २८ रोजी दिघोळ, मोहरीमार्गे खर्डा मुक्कामी. दि. २९ रोजी अंतरवाली, तिंत्रजमार्गे दांडेगाव मुक्कामी. दि. ३० रोजी देवगाव, खडेश्वरवाडी, नागरडोह, रत्नापूरमार्गे अनाळे मुक्कामी. दि. १ जुलै रोजी अनाळे, कंडारी, पाचपिंपळे, पिंपरखेडमार्गे परांडे येथे मुक्कामी. दि. २ जुलै रोजी मुंगशीमार्गे बिटरगाव मुक्कामी. दि. ३ जुलै रोजी कव्हे, कव्हेदंड, महादेववाडी, गवळवाडी, शेळके वस्तीमार्गे कुर्डू येथे मुक्कामी. दि. ४ जुलै रोजी लऊळ, कुर्मदास, पडसाळी दंडमार्गे अरण मुक्कामी. दि. ५ जुलै रोजी अरण, जाधववस्ती, व्यवहारे वस्ती मार्गे करकंब मुक्कामी, दि. ६ जुलै रोजी शेवते, जमधडे वस्तीमार्गे होळे मुक्कामी. दि. ७ जुलै रोजी कवठाळी वस्तीमार्गे शिराढोण मुक्कामी, दि. ८ जुलै रोजी शिराढोण येथून पंढरपूर मुक्कामी जाणार आहे. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पालखी सोहळ्याचे पाच रिंगणपालखीचे पहिले रिंगण दि. २३ जून रोजी मिडसावंगीत होणार आहे. दि. २७ जून रोजी दुसरे रिंगण पारगाव घुमरे येथे होणार आहे. दि. ३० जून तिसरे रिंगण नागरडोह येथे, तर चौथे रिंगण दि. ३ जुलै रोजी कव्हेदंड येथे होणार आहे. दि. ८ जुलै रोजी पादुका आरती उभे रिंगण होणार आहे.नगर प्रदक्षिणा व पुण्यतिथी सोहळापालखी सोहळा पंढरपूर येथे पोहोचताच दि. ९ जुलै रोजी सकाळी पंढरपूर नगर प्रदक्षिणा करण्यात येणार आहे. दि. ११ जुलै रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर येथील मंदिरात श्रीसंत भानुदास महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न होणार आहे.परतीचा प्रवासआषाढी वारीत सहभागी होऊन दि. १२ जुलै रोजी पालखी परतीच्या मार्गावर निघणार आहे. बार्डी, निमगाव, देवीचा माळ, हाळगाव, जामखेड, डोंगरकिन्ही, गोमळवाडे, टेंभुर्णी, येळी, शिंगोरी आदी ठिकाणी मुक्काम करीत दि. २२ जुलै रोजी पैठण येथे आगमन करणार आहे.