मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आदिवासी महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:06 AM2019-01-20T00:06:11+5:302019-01-20T00:06:14+5:30

श्रीमद् राजचंद्र मिशन संस्थेच्या श्रीमद् राजचंद्र लव्ह अ‍ॅण्ड केअर सामाजिक संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या महिला गृह उद्योगातील तब्बल १८ आदिवासी महिला रविवारी मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.

Tribal women to run in Mumbai Marathon | मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आदिवासी महिला

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आदिवासी महिला

Next

मुंबई : श्रीमद् राजचंद्र मिशन संस्थेच्या श्रीमद् राजचंद्र लव्ह अ‍ॅण्ड केअर सामाजिक संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या महिला गृह उद्योगातील तब्बल १८ आदिवासी महिला रविवारी मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. या आदिवासी महिलांनी मुंबईच्या ‘लोकमत’ कार्यालयाला शनिवारी भेट दिली.
गुजरातमधील वलसाड, नवसारीमधील धरमपूर येथे संस्थेचे काम सुरू असून, येथील महिलांना रोजगार मिळावा म्हणून संस्थेकडून महिला गृहउद्योग राबविला जात आहे. या उद्योगात शंभर महिला कार्यरत असून, त्यापैकी रूपाली महला, उषा बरिया, उर्वशी देशमुख, निर्मा नायक, रंजन महला, अंबेश्वरी रावत, निरंजना महला, जलसा पसरिया, निर्मा ठाकरिया, निकिता, कुंता महला, निराली पटेल, वासंती खिरडी, कल्पना, जसवंती चौधरी आणि जशोदा या १८ महिला मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. धरमपूर येथे सध्या ८० खाटांचे रुग्णालय कार्यरत आहे. तेथे मोफत उपचार केले जातात. संस्थेकडून शाळाही चालविली
जाते.
मुंबई मॅरेथॉनसह देशांतील उर्वरित मॅरेथॉनद्वारे उभ्या राहणाऱ्या निधीतून संस्थेतर्फे धरमपूर येथे २५० खाटांचे सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल बांधण्यात येणार असून, याद्वारे रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे रुग्णालय प्रकल्पाचा खर्च दीडशे कोटी रुपये असून, मुंबई मॅरेथॉनद्वारे पाच कोटी रुपये उभे केले जाणार आहेत. मुंबई मॅरेथॉनमध्ये २५० सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होतात.
>मी महिला गृहउद्योगात पाच वर्षांपासून काम करत आहे. मुंबईकरांमध्ये माणुसकी आहे; याचा प्रत्यय आला. आमच्या मुलांना सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी संस्था कार्यरत आहे, याचे समाधान आहे.
- उषा बरिया, धरमपूर, गुजरात
>मुंबई मॅरेथॉनमध्ये संस्थेच्या १८ महिला धावत आहेत. मॅरेथॉनद्वारे उभ्या राहणाºया रकमेतून आम्ही २५० खाटांचे रुग्णालय बांधणार आहोत.
- डॉ. बिजल मेहता,
ट्रस्टी, श्रीमद् राजचंद्र मिशन
>आम्ही महिला गृहउद्योगाद्वारे ४२ प्रकारच्या साहित्याची निर्मिती करतो. खाद्यपदार्थांपासून इतर अनेक साहित्याचा यात समावेश आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी उत्साही असून, आमच्या सहभागातून रुग्णालय उभे राहत आहे याचा आनंद आहे.
- उर्वशी देशमुख, धरमपूर, गुजरात

Web Title: Tribal women to run in Mumbai Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.