खालापुरात आदिवासी तरु णाचा डेंग्यूने मृत्यू

By admin | Published: November 3, 2014 11:10 PM2014-11-03T23:10:50+5:302014-11-03T23:10:50+5:30

खालापूर तालुक्यातील आदिवासी वाडीत एका तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला. एकुलता एक कमावता मुलाचा मृत्यू झाल्याने आदिवासी कुटुंब वा-यावर आले आहे

Tribal youth dies of dengue in Khalapur | खालापुरात आदिवासी तरु णाचा डेंग्यूने मृत्यू

खालापुरात आदिवासी तरु णाचा डेंग्यूने मृत्यू

Next

खालापूर : खालापूर तालुक्यातील आदिवासी वाडीत एका तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला. एकुलता एक कमावता मुलाचा मृत्यू झाल्याने आदिवासी कुटुंब वा-यावर आले आहे. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत असताना आरोग्य यंत्रणा मात्र अजुनही सुस्तच आहे. या घटनेने आदिवासी बांधवांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
खालापूर तालुक्याच्या नारंगीमधील सुभाष वाघमारे (२२)तरु णाचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे . नारंगी येथील एका खाजगी कंपनीत सुभाष काम करीत होता. गेली आठवडाभर आजारी सुभाषने डोनवत येथे उपचार घेतल्याचे त्याच्या घरच्यांनी सांगितले. सलग पाच दिवस ताप आणि रक्ताची उलटी झाल्याने त्याला अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या काही तासातच त्याचा मृत्यू झाला .
घरातील एकुलता एक कमावता मुलगा गेल्याने वाघमारे कुटुंब उघड्यावर आले आहे. घटनेनंतरही दोन दिवस आरोग्य यंत्रणने याची दखल घेतली नाही. अखेर सामाजिक दबाव वाढल्यानंतर खालापूर आरोग्य यंत्रणा आणि पंचायत समिती जागी झाली आहे.
नुकतीच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डी एन तेट्गुरे यांनी पिडीत कुटुंबाला भेट घेतली. सुभाष वाघमारे हा एच पी इंटरनशनल कंपनीमध्ये काम करीत असल्याने कंपनीचे अधिकारी राणे ,कर्मचारी नितीन कदम यांनी पिडीत कुटुंबाची भेट घेवून रोख स्वरु पात आर्थिक मदत केली. (वार्ताहर)

Web Title: Tribal youth dies of dengue in Khalapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.