२६/११ हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली; बोरिवलीत साकारली १५०० चौ.फूटांची रांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 08:49 PM2021-11-13T20:49:56+5:302021-11-13T20:50:26+5:30
या रांगोळी प्रदर्शनाचे उद्दघाटन बोरिवली पश्चिमेकडील आचार्य नरेंद्र विद्या मंदिरच्या प्रांगणात नुकतेच उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि बोरिवलीचे भाजपा आमदार सुनील राणे यांच्या हस्ते झाले.
मुंबई - २६/११ च्या अतिरेकी भ्याड हल्ल्यात शहीद जवानांना आंदरांजली वाहण्यासाठी बोरिवलीत १५०० चौ.फूटांची रांगोळी येथील महारांगोळी प्रदर्शनात साकारली आहे. सदर महारांगोळी प्रदर्शन दि,१२ ते २६ नोव्हेंबर पर्यंत सायंकाळी ५ ते १० पर्यंत बोरिवली पश्चिम,बाभाई मासळी मार्केट समोर, आचार्य नरेंद्र विद्यामंदिर येथे भरले आहे.येथील रांगोळी प्रदर्शन बघायला बोरीवलीकरांनी गर्दी केली आहे.
या रांगोळी प्रदर्शनाचे उद्दघाटन बोरिवली पश्चिमेकडील आचार्य नरेंद्र विद्या मंदिरच्या प्रांगणात नुकतेच उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि बोरिवलीचे भाजपा आमदार सुनील राणे यांच्या हस्ते झाले. या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन आणि संकल्पना माजी नगरसेवक व भाजपा मुंबई सचिव शिवानंद शेट्टी यांची आहे
या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मुंबईत झालेल्या २६/११ च्या अतिरेकी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आंदरांजली वाहण्यासाठी १५०० फूटांची भव्य रांगोळी तसेच छत्रपती शिवाजी महाराज,स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडेकर यांची हुबेहूब रांगोळी येथे काढण्यात आली आहे. वंडर बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन २०२९ च्या रश्मी विसपुते यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. येत्या दि, २६ नोव्हेबर रोजी शहीद जवानांना एक हजार दिव्यांच्या माध्यमांतून विनम्र अभिवादन केले जाणार असल्याची माहिती आयोजक शिवानंद शेट्टी यांनी यावेळी दिली.