Join us  

...त्या १४ विद्यार्थ्यांना श्रद्धांजली

By admin | Published: March 02, 2016 1:52 AM

पुण्यातील कॅम्प परिसरातील अबिदा इनामदार महाविद्यालयातील सहलीसाठी आलेले विद्यार्थी समुद्रात पोहण्यास उतरले.

आगरदांडा : पुण्यातील कॅम्प परिसरातील अबिदा इनामदार महाविद्यालयातील सहलीसाठी आलेले विद्यार्थी समुद्रात पोहण्यास उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा १ फे बु्रवारीला दुपारी ३.४५ च्या दरम्यान ओहोटीच्या वेळेत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी या घटनेला १ महिना झाला आहे. त्या १४ मुलांना मुरुड समुद्र किनारी श्रद्धांजली वाहण्यात आली. पीएनपी कॉलेज ग्रुपच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांकडून समुद्रकिनारी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. पीएनपी कॉलेज कला शिक्षक महेंद्र गावंड व मितेश पाटील या शिक्षकांनी समुद्रातील वाळूत उल्लेखनीय शिल्प काढून समुद्राच्या लाटेत गायब झालेली मुले व त्यांचे किनाऱ्यालगतच आढळलेले मृतदेह हुबेहूब शिल्प सादर केल्याने सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले.पुन्हा एकदा घटनेला उजाळा देत त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. पीएनपी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या संजीवनी नाईक म्हणाल्या, की, अबिदा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला ही वाईट घटना आपल्या जिल्ह्यात घडली. या दु:खद गोष्टीला एक महिना झाला असून त्यांना पीएनपी ग्रुपच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सर्व समुद्र ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. पर्यटकांनी समुद्रकिनारी फिरण्यास येताना किती खोलवर आत जावे याने भान राखले पाहिजे. मानवी जीव खूप महत्त्वाचा असून प्रासंगिक प्रसंगावधान न राखल्यास हेच संकट जिवावर बेतते. म्हणूनच पर्यटनाचा आनंद घेताना स्वत:ची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. (वार्ताहर)