विद्यानिधी संकुलात स्वर्गीय पद्मनाभ आचार्य यांना आदरांजली

By मनोहर कुंभेजकर | Published: November 23, 2023 04:57 PM2023-11-23T16:57:50+5:302023-11-23T16:58:44+5:30

मुंबई : जुहू येथील उपनगर शिक्षण मंडळ संचालित विद्यानिधी शैक्षणिक संकुलात उपनगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, नागालँड राज्याचे माजी राज्यपाल ...

Tribute to Late Padmanabha Acharya at Vidyanidhi Complex | विद्यानिधी संकुलात स्वर्गीय पद्मनाभ आचार्य यांना आदरांजली

विद्यानिधी संकुलात स्वर्गीय पद्मनाभ आचार्य यांना आदरांजली

मुंबई : जुहू येथील उपनगर शिक्षण मंडळ संचालित विद्यानिधी शैक्षणिक संकुलात उपनगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, नागालँड राज्याचे माजी राज्यपाल स्वर्गीय पद्मनाभ आचार्य यांना विद्यानिधी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.त्यांचे 10 नोव्हेंबर रोजी वयाच्या 92 व्या वर्षी देवाज्ञा झाली . 

उपनगर शिक्षण मंडळ हा समाज जीवनातील त्यांचा विशाल परिवार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अगदी विद्यार्थी जीवनातून समाजकार्य व समाजसेवेशी त्यांचे नाते जोडले गेले, ते अव्याहतपणे आजीवन एखाद्या व्रताप्रमाणे निरंतर चालूच होते. उपनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक स्वर्गीय श्रीराम मंत्री यांच्या खांद्याला खांदा लावून वंचितांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी पाच दशकाहून अधिक काळ केले .

अशांत पूर्वांचल भाग शांत करण्यासाठी पद्मनाभजी आचार्य यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून आयुष्याच्या अखेर पर्यंत आयुष्य खर्च केले. अशा शब्दात उपनगर शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष  रमेश मेहता यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना आचार्य यांचे पूर्ण जीवनच राष्ट्रासाठी समर्पित होते, अशी भावना व्यक्त केली.

विद्यानिधी शैक्षणिक संकुलातील प्राचार्य मनोज परमार व निधी पोदार यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली  इशान्यपूर्व भारतात बंधुत्व वाढविण्या साठी उपनगर शिक्षणमंडळाच्या संस्थांनी पूर्ण केलेल्या प्रोजेक्टची माहिती दिली .

राजश्री पाटील, नीलम प्रभू, संतोष टक्के, सतीश दुबे, मीरा पवार यांनी शब्दसुमनांनी  त्यांचे  मार्गदर्शन व नियोजनातील बारकावे याबद्दलच्या असंख्य आठवणी आवर्जून सांगितल्या. संगीत शिक्षक संतोष  घोसाळकर, सविता केंजाळकर लिपिक दीपक कोठेकर यांनी स्वरांजली अर्पण केली. शिक्षक  मोहन वाघ , विद्यानिधी शैक्षणिक संकुलाचे माजी विद्यार्थी जयवंत राऊत यांनी राज्यपाल कालखंडातील विशेष आठवणींना उजाळा दिला. 

उपनगर शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.साधना मोढ ,आजीव सदस्य नीरव देसाई, चंद्रहास देशपांडे ,डॉ.कीर्तीदा मेहता आचार्य सरांच्या मित्रपरिवारतील गणमान्य व्यक्ती, उपनगर शिक्षण मंडळाचे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी ,सेवक वर्ग यांनी स्वर्गीय पद्मनाभ आचार्य यांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तर आचार्य यांचे सुपुत्र  चंद्रगुप्त आचार्य यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी सांगताना  त्यांची कामातील गती ,दिशा आणि ध्येयपूर्तीचा उद्देश किती व्यापक असायचा हे आवर्जून सांगितले. 

Web Title: Tribute to Late Padmanabha Acharya at Vidyanidhi Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.