पालिकेत कचराफेक आंदोलन

By admin | Published: February 19, 2016 02:48 AM2016-02-19T02:48:17+5:302016-02-19T02:48:17+5:30

आगीत धुमसत असलेल्या देवनार डम्पिंग ग्राउंडचा कचरा महापालिका महासभेतही आज पेटला़ विरोधकांनी कचऱ्याची पिशवी महापौरांच्या मेजावर फेकल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली़

Trickster movement in the corporation | पालिकेत कचराफेक आंदोलन

पालिकेत कचराफेक आंदोलन

Next

मुंबई: आगीत धुमसत असलेल्या देवनार डम्पिंग ग्राउंडचा कचरा महापालिका महासभेतही आज पेटला़ विरोधकांनी कचऱ्याची पिशवी महापौरांच्या मेजावर फेकल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली़ या प्रकरणी काँग्रेस नगरसेविकेला निलंबितही करण्यात आले़ तरीही विरोधकांचे आंदोलन सुरूच राहिल्याने अखेर सभा गुंडाळून सत्ताधारी शिवसेना भाजपाने पळ काढला़
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील आगीप्रकरणी सभागृहात चर्चा करण्याची अनुमती विरोधी पक्षांनी मागितली होती़ मात्र, महापौरांनी त्यांची मागणी धुडकावून मनमानी कारभार सुरूच ठेवला़ यामुळे संतप्त काँग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ यांनी देवनार डम्पिंग ग्राउंडवरून आणलेल्या कचऱ्याचा नजराणाच व्यासपीठावरील अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, महापौर स्नेहल आंबेकर आणि उपमहापौर अलका केरकर यांच्यासमोर फेकला़
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महापौर व प्रशासनही क्षणभर थबकले़ या प्रकरणी शेठ यांचे महापौरांनी निलंबन केले़ मात्र, त्यानंतरही विरोधकांना बोलण्याची संधी न देता, महापौरांनी कामकाज सुरूच ठेवले़ यामुळे संतप्त काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी ‘महापौर हाय हाय’ या घोषणाबाजीला सुरुवात केली़ (प्रतिनिधी)दर वेळी विरोधी पक्षांना बोलण्याची संधी नाकारणाऱ्या सत्ताधाऱ्यांना, आज विरोधकांनी चांगलेच जेरीस आणले़ विरोधी पक्षाने कामकाज चालू न दिल्यामुळे खवळलेल्या सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाला आपल्या कृत्याची माफी मागण्यास बजाविले़ महापौरांची माफी न मागितल्यास, यापुढे विरोधी पक्षाच्या एकाही नेत्याला त्याचे मत सभागृहात मांडू देणार नाही, अशी धमकीच सत्ताधारी पक्षाने दिली़देवनारचा प्रश्न अनुत्तरित
देवनार डम्पिंग ग्राउंड गेले काही दिवस पेटत आहे़ येथील १२३ फुटांचा कचऱ्याचा डोंगर दररोज पेटत असल्याने स्थानिक नागरिक हवालदिल झाले आहेत़ हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी स्थानिक नगरसेवक सिराज मोहम्मद यांनी उपोषण केले होते़ त्यानंतर, डम्पिंग ग्राउंड परिसरातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई पालिकेने सुरू केली़ मात्र, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अद्याप दुसरा पर्याय नसल्याने देवनारचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेक़चरा गोळा करण्याची नाइट सर्विस
रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये जमा होणारा कचरा रात्रपाळीत गोळा करण्याची सेवा पालिकेने सुरू केली आहे़ या मोहिमेंतर्गत मुंबईतील २४२१ हॉटेल्स, रेस्टॉरंटमधून पालिकेमार्फत कचरा गोळा करण्यात येत आहे़ एका रात्रीत दररोज सुमारे २८२ मेट्रिक टन कचरा गोळा होत आहे़
मुंबईत दररोज सुमारे साडेनऊ हजार मेट्रिक टन कचरा तयार होतो़ अनेकदा हा कचरा थेट रस्त्यावर टाकला जातो़ यामुळे मुंबईच्या नाक्यानाक्यावर कचराकुंड्या तयार झाल्या आहेत़ त्यामुळे पालिकेने ५९ वाहनांद्वारे रात्रीच्या वेळेत हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये जात कचरा गोळा करणे सुरू केले आहे़

Web Title: Trickster movement in the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.