ट्रबल फ्री मुंबई, हाच नववर्षाचा संकल्प ! पोलिस आयुक्तांचे #AskCPMumbai वर उत्तर

By गौरी टेंबकर | Published: January 1, 2023 07:50 AM2023-01-01T07:50:02+5:302023-01-01T08:13:07+5:30

पोलिस विभाग त्यासाठी योग्य समर्थन आणि मार्गदर्शन देत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी काही स्टँडअप कॉमेडियनची मदत घेण्याचा  सल्लाही आयुक्तांना देण्यात आला. 

Trouble free Mumbai, this is the New Year's resolution! Police Commissioner's reply to #AskCPMumbai | ट्रबल फ्री मुंबई, हाच नववर्षाचा संकल्प ! पोलिस आयुक्तांचे #AskCPMumbai वर उत्तर

ट्रबल फ्री मुंबई, हाच नववर्षाचा संकल्प ! पोलिस आयुक्तांचे #AskCPMumbai वर उत्तर

Next

मुंबई : पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ३१ डिसेंबर, २०२२ रोजी ट्विटरवर एक  #AskCPMumbai नावाने प्रश्नोत्तर सत्र चालवले. ज्यात मुंबईकरांनी आयुक्तांना नववर्षाच्या संकल्पाबाबत विचारले त्यावेळी ट्रबल फ्री मुंबई  असे उत्तर त्यांनी देत  मने जिंकली. 
यावेळी नागरिकांनी अनेक प्रश्न विचारले. आयुक्तांना तणाव व्यवस्थापनाबद्दल विचारले. त्यावर मानसिक आरोग्य ही खरोखरच प्राथमिक बाब आहे. पोलिस विभाग त्यासाठी योग्य समर्थन आणि मार्गदर्शन देत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी काही स्टँडअप कॉमेडियनची मदत घेण्याचा  सल्लाही आयुक्तांना देण्यात आला. 

तुमचा दिवस कसा होता?
या प्रश्नावर अद्याप अर्धा दिवस चांगला गेला आणि उर्वरित अर्धाही तसाच जावा, असे त्यांनी म्हटले.   तुम्ही फिअरलेस पार्टी करायला परवानगी द्याल का? या प्रश्नावर नक्कीच फिअरलेस पार्टी, असे सांगत आपण सर्वांनी एकमेकांना त्यासाठी साहाय्य करू. आम्ही तुमची मदत करू आणि तुमची मदत करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा, असे आयुक्तांनी सांगितले. 

Web Title: Trouble free Mumbai, this is the New Year's resolution! Police Commissioner's reply to #AskCPMumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.