प्रदूषणामुळे होतेय मुंबईकरांची घुसमट; 'या' भागात अत्यंत वाईट स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 07:15 AM2021-12-11T07:15:39+5:302021-12-11T07:16:13+5:30

बांधकामे, प्रकल्पांच्या कामाची धूळ आणि वाहनांतून निघणारा धूर

Trouble of Mumbaikars due to pollution; Extremely bad conditions in this area | प्रदूषणामुळे होतेय मुंबईकरांची घुसमट; 'या' भागात अत्यंत वाईट स्थिती

प्रदूषणामुळे होतेय मुंबईकरांची घुसमट; 'या' भागात अत्यंत वाईट स्थिती

googlenewsNext

सचिन लुंगसे

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरां त ठिकठिकाणी सुरू असलेली गगनचुंबी इमारतींची बांधकामे आणि ठिकठिकाणी सुरु असलेल्या पायाभूत सुविधांशी निगडीत प्रकल्पातून उठणारी प्रचंड धूळ, वाहनांतून अहोरात्र निघणारा धूर; अशा अनेक घटकांमुळे मुंबईच्या प्रदूषणात सातत्याने कमालीची भर पडत आहे. अनलॉकनंतर तर यात अधिकच वाढ झाली असून, या कारणांमुळे मुंबईत दिवसागणिक अंत्यत प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. शुक्रवारी तर कुलाबा, माझगाव, बीकेसी आणि मालाड येथील हवा अत्यंत वाईट/ वाईट नोंदविण्यात आली आहे.

शुक्रवारी नोंदविण्यात आलेली हवेची गुणवत्ता

दक्षिण मुंबईसह मध्य मुंबईमध्ये अनलॉकनंतर पुन्हा एकदा बांधकामांनी वेग पकडला आहे. या बांधकामातून सातत्याने धूळ उठत आहे. ही धूळ वातावरणात पसरत आहे. त्यामुळे हवा खराब होत आहे. मुंबईत दिवसागणिक लाखो वाहने येत आणि जात असतात. यातून निघणारा धूर मुंबई परिसरावर घोंगावत असतो. त्यामुळे शहरातील हवा अधिक प्रदूषित होते आहे. मुंबईत थंडी पडली नसली तरी काही प्रमाणात का होईना धुके दाटून येते. या धुक्याचाही प्रकृतीवर विपरित परिणाम हाेत आहे. धूळ, धूर, धुके यांच्या मिश्रणाने तयार झालेले धूरके मुंबईकरांचा श्वास कोंडते आहे.

Web Title: Trouble of Mumbaikars due to pollution; Extremely bad conditions in this area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.