Join us

विघ्न टळले! गणपती विसर्जनासाठी तैनात जीवरक्षकाने पकडले 3 साप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 8:55 PM

५ दिवसांच्या विसर्जनावेळी पुन्हा धामन जातीचा साप आढळला.

मुंबई - मालाड येथील अक्सा बीचवर दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी साप आढळला होता. तर, विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी कोब्रा जातीचा नाग आढळाला होता. त्यानंतर ५ दिवसांच्या विसर्जनावेळी पुन्हा धामन जातीचा साप आढळला. साप दिसताच भाविकांची पळापळ होते आणि त्यामुळे विघ्नहर्त्याच्या विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून या बीचवर तैनात जीवरक्षक नथुराम यांनी हे तिन्ही साप दिसताच वेळी तिथं धाव घेऊन त्यांना पकडलं आणि पुढे होणारा अनर्थ टाळला. हे तिन्ही साप वन विभागाच्या परवानगीने जंगलात नेऊन सोडण्यात आले आहेत.

टॅग्स :मुंबईसापगणेशोत्सव