'मातोश्री'च्या अंगणात तिरंगी लढत, तृप्ती सावंतांचा मनसेत प्रवेश, उमेदवारी जाहीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 11:19 AM2024-10-29T11:19:54+5:302024-10-29T11:23:03+5:30
Trupti Sawant: विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व विधानसभेत आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
मुंबई
विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व विधानसभेत आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी आणि ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई रिंगणात असताना आता मनसेनंही मोठा धक्का दिला आहे. माजी आमदार आणि भाजपा उपाध्यक्ष तृप्ती सावंत यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे वांद्रे पूर्वमध्येही आता अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
तृप्ती सावंत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. पक्षात प्रवेश केल्यानंतर मनसेनं सावंत यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करत असल्याचंही म्हटलं आहे.
मुंबई भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा आणि माजी आमदार श्रीमती तृप्ती सावंत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आणि आज त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी जाहीर झाली. pic.twitter.com/MxN5NTWz2D
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 29, 2024
उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघातच आहे. हा मतदार संघ हा शिवसेनेचा गड मानला जात होता. शिवसेनेचे दिवंगत बाळा सावंत यांचं या विधानसभेवर वर्चस्व होतं. तृप्ती सावंत या त्यांच्या पत्नी आहेत. बाळा सावंत यांच्या निधनानंतर शिवसेनेनं तृप्ती सावंत यांना तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे तृप्ती सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात सावंत यांना २४ हजार ०७१ मतं मिळाली होती. झिशान सिद्दिकी निवडून आले होते.