विश्वस्तांकडून विक्रेत्यांना विक्रीस मज्जाव, मंदिर परिसरात भाजपा खासदार गोपाळ शेट्टींकडून ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 04:08 PM2022-01-15T16:08:27+5:302022-01-15T16:08:47+5:30
Gopal Shetty News: उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या निदर्शनास ही बाब येथील विक्रेत्यांनी आणली.आणि लगेच खासदारांनी येथील विक्रेत्यांना न्याय देण्याची मागणी करत काळा हनुमान मंदिरात ठिय्या आंदोलन केले.
मुंबई-सरकारच्या कोविड नियमांचे पालन करत राज्यातील मंदिरे उघडी आहेत. मंदिरात भक्त श्रद्धेने येतात.सरकारची ५० जणांची मर्यादांचे पालन करत भक्त रांगेत दर्शन घेतात. देवाला हार-फुले-तेल,नारळ अर्पण करण्याची त्यांची इच्छा असते.मात्र कांदिवली पश्चिम एम.जी.रोड येथील काळा हनुमान मंदिराच्या विश्वस्तांनी कोविडचे कारण पुढे करत हार-फुले-तेल,नारळ विकायला विक्रेत्यांना विरोध केला.आज सकाळी येथील जवळ एका कार्यक्रमाला आलेल्या उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या निदर्शनास ही बाब येथील विक्रेत्यांनी आणली.आणि लगेच खासदारांनी येथील विक्रेत्यांना न्याय देण्याची मागणी करत काळा हनुमान मंदिरात ठिय्या आंदोलन केले.
येथील विश्वस्त येथील हार-फुले-तेल,नारळ विक्रेत्यांना त्यांच्या सदर वस्तू विकण्यास मज्जाव करतात, तर दुसरीकडे मंदिरात भक्तांना पैसे टाकण्यासाठी डबे ठेवतात हे चुकीचे आहे.गरिबांच्या पोटावर पाय देण्याचा येथील विश्वस्तांना कोणताही अधिकार नाही. त्यामुळे त्यांना मंदिरा बाहेर त्यांच्या सदर वस्तू विकण्यास परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या प्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर जाधव यांनी या मंदिरात खासदार गोपाळ शेट्टी यांची भेट घेऊन याप्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.