सत्य समोर यायला हवे! "TRP प्रकरणातही 'त्यांनी' खंडणी वसूल केली होती का?; कोण आहेत पडद्यामागील सूत्रधार"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 05:21 PM2021-03-15T17:21:13+5:302021-03-15T17:22:11+5:30
Ashish Shelar on Sachin vaze : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही सचिन वाझे यांचं नाव घेत काही सवाल उपस्थित केले होते.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (sachin Vaze) यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. एनआयएच्या या कारवाईनंतर सचिन वाझेंचे पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. याशिवाय एनआयच्या तपासातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीमुळे सचिन वाझेंच्या अडचणी वाढल्या असताना राजकीय वर्तुळात देखील मोठा गदारोळ सुरु झाला आहे. भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा डाव रंगलेला असताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी या "एन्काऊंटर स्पेशल" अधिकाऱ्यांने टीआरपी प्रकरणाचा तपास करतानाही अशीच खंडणी वसूल केली होती का?, त्याही प्रकरणात मिडिया हाऊसकडून वसूली केली होती का?, कुणाच्या जोरावर मिडिया हाऊसकडून वसूलीचे बळ आले? , कोण आहेत पडद्यामागचे सुत्रधार?, सत्य समोर यायला हवे! असे अनेक सवाल उपस्थित करत एक ट्वीट केले आहे.
या "एन्काऊंटर स्पेशल" अधिकाऱ्यांने टीआरपी प्रकरणाचा तपास करतानाही अशीच
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 15, 2021
खंडणी वसूल केली होती का?
त्याही प्रकरणात मिडिया हाऊसकडून वसूली केली होती का?
कुणाच्या जोरावर मिडिया हाऊसकडून वसूलीचे बळ आले?
कोण आहेत पडद्यामागचे सुत्रधार?
सत्य समोर यायला हवे!
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. मुंब्रातील रेतीबंदर येथे हिरेन यांचा मृतदेह आढळून आला. संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं अनेक शंका उपस्थित केल्या जात असून, या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नावही घेतलं जात असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांचा किंवा एटीएसचा भाग नसलेले वाझे हिरेन यांच्या पॉर्टमार्टमच्या ठिकाणी काय करत होते, असा सवाल भाजपाकडून उपस्थित करण्यात आला होता. याआधी भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ही शंका उपस्थित केली होती.
अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी (५ मार्च) संशयास्पद अवस्थेत आढळून आला. हिरेन यांनी आत्महत्या केली असल्याचं म्हटलं जात असलं, तरी त्यांच्या मृत्यूबद्दल हिरेन यांच्या कुटुंबियांनी आणि विरोधी पक्षाने शंका उपस्थित केल्या आहेत. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही सचिन वाझे यांचं नाव घेत काही सवाल उपस्थित केले होते.
Did "Encounter spl" also running a TRP case extortion racket? Which media houses were victimised/ targeted?
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 15, 2021
Truth must come out !
Extortion mafia must b exposed ! Godfather & his cartel must be brought to justice !