प्रत्येक गुन्हा बारकाईने हाताळण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 02:34 AM2018-03-15T02:34:13+5:302018-03-15T02:34:13+5:30

कधी गर्दुल्ल्यांचा हंगामा, तर कधी पाण्याचा नळ तुटल्याची तक्रार.. अशा लहान तक्रारींपासून ते अनेक बड्या गुन्ह्यांची उकल करण्यामागे मालवणी पोलीस कायम व्यस्त असतात.

Try to handle every crime fairly! | प्रत्येक गुन्हा बारकाईने हाताळण्याचा प्रयत्न!

प्रत्येक गुन्हा बारकाईने हाताळण्याचा प्रयत्न!

Next

गौरी टेंबकर-कलगुटकर।

मुंबई : कधी गर्दुल्ल्यांचा हंगामा, तर कधी पाण्याचा नळ तुटल्याची तक्रार.. अशा लहान तक्रारींपासून ते अनेक बड्या गुन्ह्यांची उकल करण्यामागे मालवणी पोलीस कायम व्यस्त असतात. मात्र, या तक्रारी हाताळताना पोलिसांची नाही, तर नागरिकांना कायद्याची भीती हवी, यासाठी ते प्रयत्नशील असतात. प्रत्येक गुन्हा ते बारकाईने हाताळताना दिसतात.
मालवणी हा उपनगरातील अत्यंत संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीयांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. सरकारी रेकॉर्डनुसार येथील लोकसंखा ५.१ लाख इतकी आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याच्या कित्येक पटीने अधिक लोक येथे राहतात. कायदा व सुव्यवस्था सांभाळताना मालवणी पोलिसांना कधी गर्दुल्ल्यांचा हंगामा, तर कधी पाण्याचा नळ तुटल्याची तक्रार तसेच अन्य बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते.
अवघे ४१ अधिकारी आणि १६९ पोलीस कर्मचारी मिळून पाच लाखांहून अधिक लोकवस्ती सांभाळत आहेत. मालवणी पोलिसांचा अर्ध्याहून अधिक वेळ निव्वळ भांडणतंटे मिटवण्यात जातो. पण कधी कडक तर कधी प्रेमळ शब्दांत परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे.
महत्त्वाची प्रकरणे :
मालवणी देशी दारूकांड : २०१५मध्ये हातभट्टीची विषारी दारू पिऊन मालवणीत १०६ जणांनी जीव गमावला. त्यात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश पाटीलसह एकूण आठ जणांना निलंबित करण्यात आले होते.
तीन बेपत्ता तरुण : २०१५मध्ये मालवणीतील तीन तरुण अचानक बेपत्ता. त्या तरुणांनी दहशतवादी संघटनेत सहभाग घेतला.
मोरल पोलिसिंग : २०१५मध्ये मढ आणि आकसा परिसरातील लॉजेसवर धाड टाकून ४० जोडप्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांना प्रत्येकी बाराशे रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेले होते.
तिहेरी हत्याकांड : २०१६मध्ये बबली शॉ आणि तिच्या दोन नातवंडांची राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली होती.
अँकर हत्याप्रकरण : २०१७मध्ये अँकर अर्पिता तिवारी हिच्या रहस्यमयी मृत्यूवरील पडदा मालवणी पोलिसांनी उठवला.
आॅन ड्युटी २४ तास... : गणेश उत्सवात मार्वे परिसरात मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे या दिवसांत सतत ११ दिवसांच्या बंदोबस्तावर मालवणी पोलीस तैनात असतात. तसेच ईद, रमझान, कोळी उत्सव, एरंगल जत्रा आणि वेगवेगळ्या उरूसमध्ये कोणतेही गालबोट लागू नये याची काळजी घेण्याची मोठी जबाबदारीही मालवणी पोलिसांवर असते.
परिमंडळ-११
लोकसंख्या - ५.१ लाख
पोलीस उपायुक्त - विक्रम देशमाने
बीट चौकी : ४
प्लॉट क्रमांक २७, गेट क्रमांक ७, मढ आणि जनकल्याणनगर
तक्रारीसाठी संपर्क
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
दीपक फटांगरे : २८८२७५५७ / २८८१००४८
आमचे वरिष्ठ, तसेच पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभते. नागरिकांना विश्वासात घेत कोणावरही अत्याचार होणार नाही आणि पोलिसांची नाही, पण कायद्याची भीती प्रत्येकाच्या मनात राहील, या दृष्टीने आम्ही काम करत असतो. ज्यासाठी कर्मचारी आणि अधिकाºयांचे सहकार्य मला मिळत असून मी मालवणी परिसरातील कायदा आणि सुव्यस्था सांभाळण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असतो.
- दीपक फटांगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
मालवणी पोलीस ठाणे

Web Title: Try to handle every crime fairly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.