कोरोना संकटातही डिजिटल बदलांना गती देण्याचा प्रयत्न - ट्राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:06 AM2021-05-19T04:06:40+5:302021-05-19T04:06:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना संकटातही डिजिटल बदलांना गती देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती ट्रायचे अध्यक्ष पी. ...

Trying to accelerate digital change even in the Corona crisis - Troy | कोरोना संकटातही डिजिटल बदलांना गती देण्याचा प्रयत्न - ट्राय

कोरोना संकटातही डिजिटल बदलांना गती देण्याचा प्रयत्न - ट्राय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संकटातही डिजिटल बदलांना गती देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती ट्रायचे अध्यक्ष पी. डी. वाघेला यांनी दिली. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (ट्राय) १७ मे, जागतिक दूरसंचार दिनानिमित्त सुरू असलेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला.

जगभरात दूरसंचार क्षेत्रावरील अवलंबित्व वाढत चालले आहे. कोरोना काळात या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित झाले. लॉकडाऊनमुळे पूर्ण जग थांबले असताना दूरसंचारातील क्रांतीमुळेच शिक्षण, कार्यालये, व्यापार, बँका, आरोग्य, वाणिज्य आणि सामाजिक क्षेत्रातील कामे अखंड सुरू राहिली. याउलट कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी आभासी विश्व निर्माण करून संचारमुक्त संदेशवहनाचे कार्य करण्यातही आम्ही महत्त्वाची भूमिका बजावल्याचे वाघेला म्हणाले.

आज ५ जी, आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि मशीन लर्निंग या गोष्टी दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनण्याच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत. हे प्रगत तंत्रज्ञान म्हणजे डिजिटल बदलांची नांदी आहे. हे बदल पुढील दशकात मानवाच्या प्रगतीचे प्रमुख साक्षीदार असतील. त्यामुळे कोरोना संकटातही अशा डिजिटल बदलांना गती देण्याचा प्रयत्न असल्याचे वाघेला यांनी सांगितले.

.............................................

Web Title: Trying to accelerate digital change even in the Corona crisis - Troy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.